मुंबई : मराठा क्रांती मोर्चाचे पडसाद विधानभवनात उमटल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात निवेदन सादर केलं. यावेळी राज्यात सर्व म्हणजेच ६०५ कोर्सेससाठी शिष्यवृत्ति लागू केली जाईल... यासाठी ६० टक्क्यांची अट काढून टाकली जाईल... म्हणजेच मराठा विद्यार्थ्यांनाही ओबीसीप्रमाणेच सर्व सवलती मिळतील, असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलं. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

यानंतर मात्र अबू आझमी यांनी मुख्यमंत्र्यांच्या या निर्णयाला आपला आक्षेप नोंदवला. 'कोर्टाच्या म्हणण्यानुसार मुस्लिम समाजालाही पाच टक्के आरक्षण मिळायला हवं होतं... मुख्यमंत्र्यांना विचारायचंय की मुस्लिम समाजाशी काय वैर आहे... मुस्लिम समाजाला पाच टक्के आरक्षण सरकार का देत नाही? समाजाच्या २० टक्के हा मुस्लिम समाज आहे... मुस्लिम समाजालाही न्याय मिळायला हवा' असं म्हणत अबू आझमींनी आपला आक्षेप व्यक्त केला. 


एमआयएमचे आमदार मुस्लिम समाज आरक्षण मागणीसाठी उभे आहेत... बोलत आहेत... आता आम्हीही मोर्चा काढावा का? असा प्रश्नही त्यांनी यावेळी विचारला.


मुख्यमंत्र्यांचं उत्तर


यावर उत्तर देताना अबू आझमींचे सर्व आरोप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी फेटाळून लावले. नियमांनुसार, मुस्लिम, ओबीसी आणि एससी या सर्व समाजाला आरक्षण देण्यात आलंय... ते आरक्षण रद्द करण्यात आलेले नाही... शिवाय, आज ज्या सर्व ६०५ कोर्सेससाठी शिष्यवृत्तीची आणि ६० टक्क्यांनी अट काढण्याची घोषणा करण्यात आलीय ती मुस्लिम समाजासाठीही लागू राहील, असं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलंय.