एसी लोकलची पहिल्या दिवसाची कमाई किती?
ए सी लोकल ला वेगळे तिकीट दर असल्याचे माहित नसल्याने, आज गाडीत साध्या लोकलचे प्रवासीही चढले.
देवेंद्र कोल्हटकर, झी मीडिया, मुंबई : ए सी लोकल ला वेगळे तिकीट दर असल्याचे माहित नसल्याने, आज गाडीत साध्या लोकलचे प्रवासीही चढले.
एसी लोकलचे वेगळे तिकीट
नंतर दुसर्या थांब्यावर प्रवासी उतरले. त्यामुळे नंतर प्रत्येक स्थानकांवर एसी लोकलचे वेगळे तिकीट काढल्याशिवाय प्रवाशांनी चढू नये, अशा उद्घोषणा पश्चिम रेल्वे प्रशासनावर मार्फत केली जाऊ लागली.
४३५ रूपयांचा दंडही ठोठावला
तरीही एका प्रवाशाला विनातिकीट प्रवास केल्याबद्दल टीसींनी ४३५ रूपयांचा दंडही ठोठावला. तसेच आजच्या पहिल्याच दिवशी एसी लोकलच्या ५७९ प्रवाशांनी ४४६ तिकीट विकत घेतली, त्यातून ६२,७४६ रूपयांची कमाई रेल्वेला झाली आहे.