मुंबई : मुंबई-पुण्याला जोडणाऱ्या दोन्ही महामार्गांवर सकाळी अपघातांमुळे अभूतपूर्व वाहतूक कोंडी पहायला मिळाली..एक्सप्रेस वेवर अमृतांजन पुलाखाली कंटेनर उलटल्यामुळे मुंबईकडे जाणारी वाहतूक सुमारे तीन तास ठप्प होती. सकाळी सव्वाआठच्या सुमारास हा अपघात झाला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पुण्याहून मुंबईकडे जात असताना खंडाळा बोगदा पार केल्यावर चालकाचं नियंत्रण सुटलं आणि कंटेनर पलटला. त्यानंतर सव्वाअकराच्या सुमारास ८० टनी क्रेनच्या मदतीनं हा कंटेनर बाजूला करण्यात आला. रविवारी सुटी असल्याने मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांची संख्या तुलनेने कमी होती. मात्र या लेनवर वाहनांच्या दीड ते दोन किलोमीटर लांब रांगा लागल्या होत्या. त्यामुळे काही काळ एक्सप्रेस वेनं मुंबईकडे जाणारी वाहतूक जुन्या मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्गावर वळविण्यात आली होती. 


त्याच वेळी जुन्या महामार्गावर पेट्रोलची गळती होऊन टँकरनं पेट घेतल्यानं वाहतूक ठप्प झाली होती. पनवेल आणि रसायनीदरम्यान भोकरपड़ा गावाजवळ ही घटना घडली. ही आग इतकी भीषण होतो की धुरांचे लोट रस्त्यापर्यंत येत होते. त्यामुळे पनवेल आणि खोपोलीकडे जाणारी वाहतूक बंद करावी लागली. आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आल्यानंतर वाहतूक पुन्हा सुरू झाली.