मुंबई : मुंबई गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळाने सदनिका सोडत - २०१८ व गिरणी कामगार सदनिका सोडत - २०१८ बाबत अद्यापपर्यंत कोणतीही कार्यवाही सुरु केलीली नसताना सोडती संदर्भात ऑनलाईन अर्ज / नोंदणी अर्ज याबाबत चुकीची माहिती देणाऱ्या २५ संकेतस्थळांवर कायदेशीर कारवाई करावी, अशी लेखी तक्रार 'म्हाडा'तर्फे सायबर पोलिसांकडे करण्यात आली आहे. मुंबई मंडळाचे मुख्य अधिकारी श्री. सुभाष लाखे यांनी दिलेल्या आदेशानुसार 'म्हाडा'च्या मुख्य माहिती व संचार तंत्रज्ञान अधिकारी यांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक, सायबर पोलीस ठाणे, गुन्हे शाखा, गुन्हे अन्वेषण विभाग, वांद्रे-कुर्ला संकुल, मुंबई यांच्याकडे सदर तक्रार दाखल केली आहे. 


या दाखल तक्रारीत पुढील वेबसाईटचा समावेश आहे...


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

१) https://hindi.pradhanmantriyojana.in/mhada-lottery-2017-mumbai-online-application-form


२) 2018-mumbai">http://mhadalottery2017.in/mhada-lottery-2018-mumbai


३) www.yogiyojana.in
 
४) chsma.in/mhada-lottery-mumbai-application-form-registration


५) https://mhadalotterygov.in


६) www.tips.omsaitech.co.in


७) www.kbcregistration2018.in


८) www.loansninsurances.com


९) hotelthekaran.in


१०) https://pradhan-mantri-pm-awas-yojana.in


११)  https://www.mhadalottery.co.in


१२) www.kphospitality.in/mhada-lottery-2017-mumbai-online-application-form


१३) www.hindisource.in


१४) www.asj.co.in


१५) https://flats2bhk.com


१६) examresult2018.in


१७) mhadalottery.in


१८) https://www.facebook.com/mhadalotteryMumbai/


१९) www.vivinapoli.eu


२०) Mhada-lottery2018.in


२१) www.govnokri.in


२२) www.snmarketing.co.in/mhada-lottery-2017-mumbai-online-application-form


२३) invent-yourself.eu/mhada-lottery-winners-list-nt-2018-india_3606


२४) m.yotube.com/mhadalotteryresults2018 


२५) www.mhadalottery.2018 


या संकेतस्थळांविरुद्ध कारवाईची मागणी करण्यात आली आहे. सदर संकेतस्थळांच्या रेजिस्टर्ड डोमेन नाव व इतर माहितीही तक्रारीत देण्यात आली आहे. सदर तक्रारीत म्हटले आहे की, 'म्हाडा'च्या मुंबई मंडळातर्फे सदनिका सोडतीकरिता https://lottery.mhada.gov.in ही अधिकृत  URL उपलब्ध करण्यात आलेली आहे. मात्र, या संकेतस्थळांवर म्हाडा सदनिका सोडत- २०१८ संदर्भात नागरिकांची दिशाभूल करणारी माहिती दर्शविण्यात आली आहे. त्यामध्ये सोडत २०१८ चा दिनांक सप्टेंबर असा जाहीर करण्यात आला आहे. याशिवाय या संकेतस्थळावर म्हाडा सदनिका सोडत- २०१८ संदर्भात नागरिकांच्या प्रश्नांना उत्तरे दिली जात आहेत. त्यामुळे नागरिकांना चुकीची माहिती देऊन नुसती फसवणूक नव्हे तर आर्थिक फसवणूक होण्याची शक्यता आहे. त्यामुळे 'म्हाडा'ची जनमानसातील प्रतिमा मलिन होण्याची शक्यता असल्याचे तक्रारीत म्हटलं आहे.