देवेंद्र कोल्हटकरसह ब्युरो रिपोर्ट झी २४ तास मुंबई : बुलेटीनच्या सुरुवातीला सामान्य रेल्वे प्रवाशांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी समोर येतेय. एक फेब्रुवारी पासून सर्वसामान्य जनतेसाठी लोकलसेवा सुरू होतेय. लोकल प्रवासासाठी नियमांचं पालन करणं अत्यंत आवश्यक आहे.नाहीतर तुमच्यावर कायदेशीर कारवाई होत गुन्हा दाखल होऊ शकतो. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

फेब्रुवारीच्या पहिल्या दिवसापासून सामान्यांना सशर्त लोकल प्रवासाला परवानगी मिळालीय. त्यानुसार पहिली लोकल ते सकाळी ७ वाजेपपर्यंत दुपारी १२ ते 4 वाजेपर्यंतआणि रात्री 9 पासून शेवटच्या लोकलपर्यंत सर्वसामान्यांना लोकलनं प्रवास करता येणाराय. 


बाकीच्या वेळेत याआधी परवानगी दिलेल्या विशिष्ट प्रवर्गातील प्रवाशांनाच लोकल उपलब्ध असणाराय. प्रवासाची वेळ आणि शिस्त न पाळणाऱ्या प्रवाशांवर कारवाईचा बडगा उगारला जाणार असल्याचे लोहमार्ग पोलीस आयुक्त रवींद्र सेनगावकर यांनी सांगितले.



दुसरीकडं रेल्वे प्रशासनानं प्रवाशांसाठी जय्यत तयारी सुरु केलीय. बंद असलेले मार्ग खुले करण्यात आलेत. सॅनिटायझेशन झालंय. युटीएस तिकीट सेवाही सुरु करण्यात येणार असल्याचे वेस्टर्न रेल्वे पीआरओ सुमित ठाकूर यांनी सांगितले.


जवळपास ३१० दिवसांनंतर सामान्यांना लोकलप्रवास करता येणार आहे. पहिल्या दिवशी लोकलसेवेचा बोजवारा उडू नये हीच माफक अपेक्षा व्यक्त करण्यात येतेय.