मुंबई : मिस्टर इंडिया राहिलेल्या बॉडीबिल्डर मनोज पाटीलने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. मिळालेल्या माहितीनुसार त्याने एक सुसाईड नोट देखील लिहीली आहे. ज्यामध्ये मनोजने अभिनेता साहिल खानवर गंभीर आरोप केले आहे. 'पत्नी आणि माझ्यात असलेल्या वादाचा फायदा घेत आणि पत्नीची दिशाभूल करत तो सतत माझं करियर संपविण्याची धमकी मला देत आहे...' असं मनोजने सुसाईड नोटमध्ये लिहिलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मनोजला सध्या कूपर रूग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. त्याची प्रकृती स्थिर असल्याचं सांगितलं जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मनोज पाटीलने गोळ्या खाऊन आत्महत्येचा प्रयत्न केला होता. बुधवारी रात्री मनोज पाटीलने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. मनोज पाटीलने अभिनेता साहिल खानवर गेल्या अनेक दिवसांपासून छळ करत असल्याचा आरोप केला आहे.



काय लिहिलं सुसाईड नोटमध्ये?
मनोज पाटील यांनी आपल्या सुसाईड नोटमध्ये म्हटले आहे की, छळ आणि निंदा केल्यामुळे तो आत्महत्येचे पाऊल उचलत आहे. मिस्टर इंडिया राहिलेले मनोज पाटील मिस्टर ऑलिम्पियासाठी प्रयत्न करत होता. साहिल खानलाही या स्पर्धेत प्रवेश करायचा होता. मनोज पाटील यांनी आरोप केला की, याच कारणामुळे साहिल खान मनोजला स्पर्धेत सहभागी होऊ न देण्याचा प्रयत्न करत आहे.


दरम्यान, मनोज पाटीलच्या कुटुंबीयांनी ओशिवरा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. मनोज पाटील यांचे कुटुंबीय मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेऊन मदतीची याचना करणार असल्याचेही कळत आहे.