मुंबई : आजकाल ऑनलाईन खरेदी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. परंतू त्यावरही सायबर चोरट्यांची नजर असते. वेगवेगळ्या मार्गाने सायबर चोरटे तुमच्या पैशावर गंडा घालत असतात. नुकतीच एक प्रसिद्ध अभिनेत्री सायबर चोरीची बळी ठरली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ऑनलाईन शॉपिंग करणे हा सगळ्यांच्या आवडीचा आणि जिव्हाळ्याचा विषय झाला आहे. सेलिब्रिटीही या ऑनलाईन शॉपिंग-व्यवहाराच्या प्रेमात आकंठ बुडालेले दिसतात. इंटरनेटवर एखादी गोष्ट सर्च करतानाही आजकाल सायबर क्राईमचे बळी ठरत आहेत. सायबर चोर थेट युजर्सच्या बँक खात्यातून पैसे लंपास करीत आहेत. 


नुकतीच एक टेलिव्हिजन अभिनेत्री फसवणूकीची बळी ठरली आहे. अमन संधू असे टीव्ही अभिनेत्रीचं नाव आहे. तिने शनिवारी गोरेगाव पोलिस स्टेशन येथे ऑनलाईन फसवणूक करणाऱ्यांविरोधात तक्रार दाखल केली आहे. क्राईम पेट्रोल आणि सावधान इंडिया सारख्या मालिकांमध्ये अभिनेत्री अमन संधू टीव्ही वर झळकलेली आहे. 


व्हॉट्सअँप वर आलेल्या एका लिंकवर क्लिक केल्यानंतर तिच्या अकाऊंटमधून सुमारे दोन लाख रुपये गायब झाल्याचं तिच्या लक्षात आलं. 
 
यावर तिने पोलिसात तक्रार दिली आहे. आईच्या उपचारांसाठी एका प्रसिद्ध डॉक्टरांचा नंबर शोधण्यास अमननं गुगलची मदत घेतली. 
 
 गुगवर ऑर्थोपेडिक डॉक्टरांचा नंबर सर्च केल्यानंतर तिनं एका नंबरवर क्लिक केलं. यानंतर व्हॉट्सअप ओपन झालं आणि त्याच दरम्यान तिचा फोन हॅक करण्यात आला. 
 
 फोन हॅक करण्यात आल्यानंतरर तिच्या बॅंक अकाऊंटमधून तब्बल दोन लाख ट्रान्सफर करण्यात आले आहेत. 
 
 याबाबत पोलीस तपास करत असून अनोळखी व्यक्तींनी पाठवलेल्या लिंक वर क्लिक करू नका असे आवाहन सायबर पोलिसांनी केले आहे