मुंबई : ज्येष्ठ लेखक जावेद अख्तर (Javed Akhtar) यांनी दाखल केलेल्या मानहानीप्रकरणी जुहू पोलिसांनी बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौत (Kangana Ranaut) हिला समन्स बजावले आहे. तिला मुंबई पोलिसांसमोर हजर व्हावे लागेल. मुंबई पोलिसांनी बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौतला समन्स पाठवले गेले आहेत. (Actress Kangana Ranaut summoned by Mumbai Police) उद्या मुंबई पोलिसांनी ( Mumbai Police) जुहू पोलीस स्टेशनमध्ये कंगनाला (Kangana Ranaut) उद्या हजर राहण्याचे आदेश देण्यात आलेत. ज्येष्ठ कवी आणि बॉलिवूडमधील ज्येष्ठ पटकथाकार जावेद अख्तर यांनी कंगनावर मानहानीचा दावा केला आहे. डिसेंबर २०२० मध्ये जावेद अख्तर (Javed Akhtar) यांनी अंधेरी न्यायालयात मानहानीचा दावा केला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

न्यायालयाने जुहू पोलिसांना याप्रकरणी चौकशी करून रिपोर्ट सादर करण्याचे आदेश दिले होते. १६ जानेवारीला रिपोर्ट देण्याचे कोर्टाचे आदेश होते. मात्र जुहू पोलिसांनी वेळ मागून घेतल्यामुळे ही मुदत १ फेब्रुवारीपर्यंत वाढवण्यात आली आहे. टेलिव्हिजन मुलाखतींमध्ये रानौत हिने जावेद अख्तर यांच्याविरूद्ध बदनामीकारक टीका केल्याप्रकरणी गुन्हेगारी तक्रार दाखल केली होती. अख्तर यांनी नोव्हेंबर, २०२० मध्ये अंधेरी महानगर दंडाधिकाऱ्यांसमोर कंगनाविरोधात फौजदारी तक्रार दाखल केली होती.


जून २०२० मध्ये अभिनेता सुशांतसिंग राजपूत यांच्या निधनानंतर मुलाखतीत बोलताना बॉलिवूडमध्ये असलेल्या "coterie" चा उल्लेख करताना कंगनाने आपले नाव ओढले असल्याचा आरोप अख्तर यांनी आपल्या तक्रारीत केला आहे. अख्तर यांने धमकी दिल्याचेही कंगनाने म्हटले होते, असेही त्यांनी म्हटले आहे. 


तक्रारीत असे म्हटले आहे की तिच्या या वक्तव्यांने सार्वजनिक प्रतिमा डागाळली गेली. कंगना अनेक वादात अडकली असून तिच्या वक्तव्यांवरून व ट्विटमुळे तिच्यावर अनेक गुन्हे दाखल झाले आहेत.