मुंबई : राज्यपाल भगतसिंग कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांच्या दालनात झालेल्या एका फोटोशूटवरुन (Photo Shoot) नवा वाद निर्माण झाला आहे. राज्यपालांच्या (Governer) भेटीसाठी एका एनजीओच्या काही महिला राजभवनात आल्या होत्या. संबंधित महिला निमंत्रित होत्या. या महिलांबरोबर अभिनेत्री मायरा मिश्रा (Maera Mishra) ही देखील होती. राज्यपाल कोश्यारी दालनात येण्याआधी मायरा मिश्राने मोबाईलमधून राज्यपालांच्या खूर्चीसोबत काही फोटो काढले. त्यानंतर ते फोटो तीने आपल्या इन्स्टाग्राम (Instagram) अकाऊंटवर व्हायरल केले. सोशल मीडियावर (Social Media) फोटो व्हायरल झाल्याने एकच चर्चा रंगली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राज्यपालांच्या खूर्चीसोबत मायरा मिश्राचे फोटो व्हायरल झाल्यानंतर राजभवनाकडून नाराजी व्यक्त करण्यात आली असून राज्यपालांच्या दालनात ते नसताना परस्पर फोटो काढल्यामुळे त्या महिलांना समज देण्यात आली आहे. राज्यपाल यांच्या भेटीआधी मोबाईल फोन बाहेर ठेवावेत असा नियम असताना परस्पर मोबाईलवरून फोटो काढल्याचं राजभवनातील वरिष्ट अधिकारी यांनी सांगितलं. असले पोरकटपणा केल्याने राजभवन प्रतिमा मलिन होत असल्याचं संबंधित अधिकाऱ्याने सांगितलं.


कोण आहे मायरा मिश्रा?
मायरा मिश्रा ही एक मॉडेल आणि अभिनेत्री आहे. एमटीव्ही स्प्लिट्सविलाच्या 11 सीझनमध्ये भाग घेतल्यानंतर मायरा मिश्रा चर्चेत आली. उत्तर प्रदेशमध्ये जन्म झालेल्या मायराने छोट्या पडद्यावर आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. अशोका, उडाण, बहू बेगम आणि भंवर सारख्या टीव्ही मालिकांमध्ये तीने भूमिका साकारल्या आहेत. मायराचं आईएस अधिकारी बनण्याचं स्वप्न होतं, पण लहानपणापासून तिला अभिनयाचीदेखील आवड होती. अभिनयातच आपली कारकिर्द करण्याचा निर्णय तीने घेतला.


अभिनयासोबकच मॉडलिंगमध्येही तीने आपली छाप उमटवली आहे. इन्स्टाग्रामवर मायराचे अनेक फॉलोअर्स आहेत. सोशल मीडियावर ती चांगलीच सक्रिय असते. आपले फोटो आणि व्हिडिओ ती इन्स्ट्रग्राम अकाऊंटवर शेअर करत असते. याला हजारोंने लाईक्सही असतात. टीव्ही मालिकांबरोबरच मायराने काही म्युझिक व्हिडिओमध्येही काम केलं आहे. 'रोना सिखड़ वे' आणि 'सोनियो 2.0' या म्युझिक व्हिडिओत तीने अभिनय केला आहे.