Chitra Wagh vs Urfi Javed : भाजप नेत्या चित्रा वाघ (BJP Leader Chitra Wagh) आणि सोशल मीडियाताली वादग्रस्त अभिनेत्री उर्फी जावेद (Urfi Javed) यांच्यातील वाद शमायला तयार नाही. जिथे सापडेल तिथे उर्फीला थोबडवण्याचा इशारा चित्रा वाघ यांनी दिला होता. इतकंच नाही तर भर रस्त्यावर अतरंगी कपडे घालून फिरणाऱ्या ऊर्फी जावेदविरोधात चित्रा वाघांनी मुंबई पोलीस आयुक्तांकडे (Mumbai Police Commissioner) तक्रार नोंदवून अटक करण्याची मागणी केली होती.  त्यानंतर आज पुन्हा एकदा उर्फी जावेदने ट्विट करत चित्रा वाघ यांना डिवचलं आहे. यावेळी उर्फीनं मराठीमध्ये ट्विट केलंय. उर्फी जावेदला दिला त्रास, चित्रा अशी कशी तू ग सास? असं ट्विट उर्फीनं केलंय. (Urfi Javed Shared Post And Made Fun Of Chitra Wagh)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'उर्फी जावेदला दिला त्रास, चित्रा अशी कशी तू ग खास' 'चित्राताई मेरी खास है,फ्युचर में होने वाली सास है' असं उर्फीने आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे. इतकंच नाही तर उर्फीने आणखी एका ट्विटमध्ये चित्रा वाघ यांना 'सॉरी चित्रा वाघजी! आय लव्ह यू... असंही म्हटलं आहे. 


मेरी डीपी इतनी ढासू, चित्रा वाघ मेरी सासू.'
त्याआधी कालही उर्फीनं तिच्या ट्विटर अकाऊंटवरून एक पोस्ट शेअर केली होती. यात तीने म्हटलं होतं,  'मेरी डीपी इतनी ढासू, चित्रा वाघ मेरी सासू.' उर्फीनं शेअर केलेली ही पोस्ट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली असून नेटकरी त्यावर प्रतिक्रिया दिली आहे. एक नेटकरी म्हणाला, हे तर लव्ह जिहाद झालं. दुसरा नेटकरी म्हणाला, अजून आपली खिल्ली उडवण्याचं बाकी आहे. तिसरा नेटकरी म्हणाला, उर्फी इतनी ढासू, चित्रा वाघके निकले आसूँ. आणखी एक नेटकरी म्हणाला, सासू बाई कोमात सून बाई जोमात, अशा अनेक कमेंट करत नेटकऱ्यांनी उर्फीच्या पोस्टवर प्रतिक्रिया दिली आहे. 


'आपण लवकरच मैत्रिणी होऊ chitruuuu!'
उर्फी जावेदच्या कपड्यांवरून चित्रा वाघ यांनी आरोप केल्यापासून उर्फी आणि चित्रा वाघ यांच्यात ट्विटर वॉर सुरू झाला आहे. उर्फीनं ट्विट करत, 'आपण लवकरच मैत्रिणी होऊ चित्रूsss' असं म्हटलं होतं. 


चित्रा वाघ यांनी काय म्हटलं होतं?
महाराष्ट्रात उर्फी जावेदचा नंगा नाच चालू देणार नाही, असा इशारा चित्रा वाघ यांनी दिला होता. उर्फीला विरोध नाही, पण तिच्या विकृतीला विरोध आहे. उर्फी मुंबईच्या (Mumbai) रस्त्यावर उघडेनागडे नंगा नाच करते, इथं धर्माचा विषय नाही, सार्वजनिक ठिकाणी महाराष्ट्रात सुरु असलेल्या विकृतीला विरोध असल्याचं चित्रा वाघ यांनी म्हटलं होतं.