मुंबई : आदर्श घोटाळा प्रकरणी उच्च न्यायालयाने माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे खासदार अशोक चव्हाण यांना दिलासा दिलाय. यावर चव्हाण यांनी प्रतिक्रिया व्यक्त केलेय. माझ्यावरील आरोप हा राजकीय षडयंत्राचा भाग होता, असे ते म्हणालेत. 


न्याय व्यवस्थेवर पूर्ण विश्वास 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

 राजकीय हेतूने प्रेरित निर्णय घेण्यात आलाय. आपला न्याय व्यवस्थेवर पूर्ण विश्वास होता. आपण न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत करतो, असे चव्हाण म्हणालेत.


राजकीय फायद्यासाठी आरोप


दिलासा मिळताच अशोक चव्हाण यांनी भाजपविरुद्ध आक्रमक पवित्रा घेतला आहे. माझ्यावर आदर्श घोटाळ्याचा आरोप करणे, हा राजकीय षडयंत्राचा भाग होता, असे ते म्हणालेत. दरम्यान, या आधी अशोक चव्हाण यांच्याविरुद्ध खटला चालवण्याकरिता तत्कालीन राज्यपाल के. शंकरनारायणन यांनी मंजुरी नाकारली होती. मात्र, फेबुवारीमध्ये राज्यपाल विद्यासागर राव यांनी चव्हाण यांच्याविरोधात खटला चालविण्यास मंजुरी दिली होती.


चव्हाण यांना दिलासा


 विद्यासागर राव यांच्या निर्णयाला चव्हाण यांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. उच्च न्यायालयाचे न्यायाधीश रणजित मोरे यांच्या खंडपीठाने याविषयी सुनावणी पूर्ण केल्यानंतर आपला निर्णय राखून ठेवला होता. या निर्णयावर आज सुनावणी झाली आणि चव्हाण यांना दिलासा दिला.