कृष्णात पाटील, झी मीडिया, मुंबई : आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांच्या संकल्पनेतले प्रकल्प राज्यसरकार रोखणार असल्याची शक्यता वर्तवली जातेय. पालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांना हाताशी धरून आदित्य ठाकरेंनी हे प्रकल्प राबवले होते. त्या प्रकल्पांना आता राज्य सरकार रोखणार असल्याची माहिती मिळत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

खारं पाणी गोडं करण्याच्या खर्चिक प्रकल्पाचाही यात समावेश आहे. मुंबई भाजपचा या प्रकल्पांना कडाडून विरोध होता. आशिष शेलार यांनी याबाबत अनेकदा पाठपुरावाही केला होता.


कोणते प्रकल्प थांबवले जातील ते पाहूया 
खारे पाणी गोड करण्याचा प्रकल्प,  23 हजार 447 कोटी रूपये खर्चाचे ७ सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प, माहुल पंपिग स्टेशनसाठी आदलाबदल केलेला भूखंड, वरळीतील अनावश्यक प्रकल्प रोखले जाण्याची शक्यता आहे.