मुंबई : संजय राऊत यांनी आपल्या भाषणात मुंबईतील हिंदी भाषिक आणि उत्तरप्रदेश सोबत असलेल्या वेगळ्या नात्याविषयी भूमिका मांडली होती. आम्ही मुंबई फिरतो, तेव्हा लाखो हिंदी भाषिक लोक दिसतात. मुंबईत म्हणाल तर अर्धी मुंबई हिंदी भाषेत बोलते, हे आमचं उत्तर प्रदेशशी नातं आहे, असं ते म्हणाले होते.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आदित्य ठाकरे आणि संजय राऊत यांच्या या भाषणावरून मनसेने त्यांच्यावर निशाणा साधलाय. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हे मराठी माणसासाठी लढले, तुरुंगात गेले आणि आता हे उत्तर भारतीयांचे लांगूलचालन करत आहेत. त्यामुळे उत्तर प्रदेश सरकारने त्यांना "भय्या भूषण" पुरस्कार दिला पाहिजे, अशी खोचक टीका मनसे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी केलीय.


कचरा वर येतोच
गेल्या पंचवीस वर्षांपासून महापालिकेत शिवसेनेची सत्ता आहे. या पंचवीस वर्षात शिवसेनेने महानगरपालिकेत अनेक घोटाळे केलेत. समुद्रात कितीही खोल कचरा टाका तो वर येतोच. हे पर्यावरण मंत्र्यांना अधिक माहित असेल अशी प्रतिक्रिया त्यांनी यशवंत जाधव यांच्यावर पडलेल्या धाडीवरून केली.