मुंबई : Aditya Thackeray visit to Ayodhya : शिवसेनेचे नेते आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे हे अयोध्या दौऱ्यासाठी मुंबईतून विमानाने रवाना झालेत. ते थोड्याच वेळात लखनऊ विमानतळावर दाखल झालेत. आदित्य ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्यासाठी शिवसैनिकांकडून जोरदार शक्तिप्रदर्शन करण्यात आले आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


आदित्य ठाकरेंचा आज दिवसभराचा भरगच्च कार्यक्रम आहे. रामलल्लाच्या दर्शनापासून ते संध्याकाळी अयोध्येत शरयू नदीच्या घाटावर आरतीही करण्यात येईल. लखनऊ विमानतळावर दाखल झाल्यानंतर आदित्य ठाकरे दुपारी इस्कॉन मंदिराला भेट देतील. त्यानंतर ते पत्रकार परिषद घेणार आहेत. तसंच रामल्ला, हनुमान गढीचं दर्शन घेतल्यानंतर संध्याकाळी शरयू नदी घाटावर आरती करतील. 


आज संध्याकाळी आदित्य ठाकरे मुंबईत परतणार आहेत. आदित्य यांच्या दौऱ्याच्या निमित्ताने महाराष्ट्रातून शेकडो शिवसैनिक अयोध्येत दाखल झालेत. तर शिवसेना नेते खासदार संजय राऊत आणि नेते मंडळी दोन दिवस आधीपासूनच अयोध्येत डेरेदाखल झाली आहेत.