मुंबई : विधानसभा निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर सर्व पक्षांचे उमेदवार प्रचारासाठी सज्ज झाले होते. प्रचारादरम्यान पक्षांनी अनेक युक्त्या लढवल्या. युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे वरळी मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते. ठाकरे घराण्याचा पहिला व्यक्ती युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे विधानसभेत पोहोचले आहेत. आदित्य ठाकरे लढवत असलेल्या मतदार संघाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले होते.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आदित्य ठाकरेंच्या विरोधात अपक्ष उमेदवार अभिजित बिचुकले निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते. आदित्य ठाकरे यांचा विजय निश्चित असला तरी बिचुकलेंना किती मतं मिळतील याकडे मतदारांचे लक्ष होते. 


निकाल महाराष्ट्राचा : महाराष्ट्रातील २८८ मतदारसंघातील हे आहेत विजयी उमेदवार


विविध मार्गांनी प्रचाराच्या युक्त्या आजमवल्यानंतर कलाविश्वातील अभिनेता संजय दत्त, मीथुन चक्रवर्ती यांनी युवासेना प्रमुख आदित्य ठाकरेंचे समर्थन करून, मतदारांना मत देण्याचे आवाहन केले होते. त्याचप्रमाणे आदित्य ठाकरेंनी 'जन आशीर्वाद' यात्रेच्या माध्यमातून जनतेसोबत संवाद साधला होता. 


कोल्हापूरच्या आंबाबाईचे दर्शन घेवून त्यांनी आपल्या नवीन राजकीय प्रवासाला सुरूवात केली आणि अखेर ठाकरे घराण्याची पहिली व्यक्ती युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे विधानसभेवर निवडून गेली. आदित्य ठाकरे ६७ हजार ६७२ मतांनी विजयी झाले आहेत.