संपत्तीसाठी नाही देवेंद्र फडणवीस देशात या गोष्टीसाठी प्रसिद्ध...
मंत्री आणि राजकारण्यांच्या संपत्तीबाबत सर्वांना नेहमीच उत्सुकता असते. देशातल्या ३१ मुख्यमंत्र्यांच्या संपत्तीची माहिती एडीआरनं प्रसिद्ध केलीय.
मुंबई : मंत्री आणि राजकारण्यांच्या संपत्तीबाबत सर्वांना नेहमीच उत्सुकता असते. देशातल्या ३१ मुख्यमंत्र्यांच्या संपत्तीची माहिती एडीआरनं प्रसिद्ध केलीय.
आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू हे मुख्यमंत्र्यांच्या संपत्तीच्या यादीत अव्वल ठरले आहेत. त्यांच्या पाठोपाठ अरुणाचल प्रदेशचे भाजपचे मुख्यमंत्री पेमा खंडू हे दुसऱ्या क्रमांकावर आहेत. तर काँग्रेसचे पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांनी श्रीमंतांच्या यादीत तिसरं स्थान पटकावलंय.
सर्वात कमी संपत्ती असलेल्या मुख्यमंत्र्यांमध्ये त्रिपुराचे मुख्यमंत्री माणिक सरकार यांनी अव्वल स्थान पटकावलंय. त्यांच्याकडे केवळ २६ लाखांची संपत्ती असून ते सर्वात गरीब ठरले आहेत. तर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या गरिबांमध्ये दुसऱ्या क्रमांकावर असून जम्मू काश्मिरच्या मुख्यमंत्री महबुबा मुफ्ती या तिसऱ्या क्रमांकावर आहेत.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस संपत्तीसाठी नाही तर दुसऱ्याच गोष्टीसाठी प्रसिद्धीच्या झोतात आलेत. देशात सर्वात जास्त गुन्हे दाखल झालेल्या मुख्यमंत्र्यांच्या यादीत महाराष्ट्राच्या देवेंद्र फडणवीसांचा सर्वात वरचा क्रमांक आहे.
तर देशातील इतर २० मुख्यमंत्र्यांविरोधात कोणताही गुन्हा दाखल नाही.