मुंबई : सुशांत सिंह राजपूत मृत्यूप्रकरणी ड्रग्ज अँगल पुढे आल्यानंतर अनेक बॉलिवूड कलाकारांची नावं समोर येत आहेत. एनसीबीकडून अनेक बॉलिवूड कलाकारांना समन्स बजावण्यात आला आहे. त्यानुसार दीपिकालाही एनसीबीने चौकशीसाठी बोलवलं आहे. दीपिका एनसीबी कार्यालयात पोहचली असून तिची चौकशी सुरु आहे. दीपिकानंतर श्रद्धा कपूर, सारा अली खानचीही एनसीबी चौकशी होणार आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

- सारा अली खान एनसीबी झोनल कार्यालयात दाखल



- सारा अली खान जुहू या तिच्या निवासस्थानावरुन एनसीबी कार्यालयाकडे रवाना


- दीपिकाची दोन तासांपासून चौकशी सुरु


- दीपिकाप्रमाणेच श्रद्धाही मीडियाला गुंगारा देऊन एनसीबी कार्यालयात चौकशीसाठी दाखल


- ड्रग्ज प्रकरणी श्रद्धा कपूर एनसीबी झोनल ऑफिसमध्ये दाखल 



मीडियाला गुंगारा देऊन दीपिका एनसीबी कार्यालयात पोहचली. मध्य रात्रीचं दीपिका तिच्या घरातून अज्ञात स्थळी गेली असल्याची माहिती आहे. तेथूनच ती एनसीबी कार्यालयात पोहचली आहे. दीपिका एकटीच चौकशीसाठी हजर झाली आहे. आज दीपिका आणि तिची मॅनेजर करिश्मा प्रकाश यांची समोरा-समोर चौकशी होणार असल्याचं समजतं आहे.



शुक्रवारी दीपिकाची मॅनेजर करिश्मा प्रकाशची चौकशी करण्यात आली होती. यावेळी करिश्माने त्या व्हाट्सऍप ग्रुप प्रकरणी एनसीबीला माहिती दिली आहे. जया शाह, करिश्मा आणि दीपिका या ग्रुपमध्ये फक्त तीन जणांचा समावेश होता. महत्त्वाची गोष्ट म्हणजे या ग्रुपची ऍडमीन दीपिका होती. या ग्रुपमध्ये मुख्यतः ड्रग्सवरून चॅट होत असे, असंही तिने सांगितल्याची माहिती आहे.


 व्हायरल झालेल्या चॅटमध्ये २०१७ साली दीपिकाने  हशिश नावाच्या ड्रग्सची मागणी केल्याची कबुली देखील करिश्माने दिली असल्याचं सांगण्यात येत आहे. 


आज दीपिका, श्रद्धा कपूरसोबत सारा अली खानचीही चौकशी होणार आहे. या चौकशीतून आता काय खुलासे होणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.