Anil Deshmukh :14 महिन्यांचा वनवास संपला! अनिल देशमुख अखेर जेलबाहेर आले; सुप्रिया सुळेंसह राष्ट्रवादीच्या दिग्गज नेत्यांनी...
कथित 100 कोटी वसुली प्रकरणात अनिल देशमुखांना अटक झाली होती. तब्बल 14 महिन्यांनतर अनिल देखमुख जेलबाहेर आले आहेत. राष्ट्रवादीच्या नेत्यांनी अनिल देशमुख यांचे जंगी स्वागत केले.
Anil Deshmukh Released From Jail : राज्याचे माजी गृहमंत्री तथा राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख ( Former Home Minister Anil Deshmukh) अखेर जेलमधून बाहेर आले आहेत. राष्ट्रवादीचे तीन मोठे नेते स्वत: अनिल देशमुखांच्या स्वागतासाठी आर्थर रोड जेलबाहरे हजर होते. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील(Jayant Patil), विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar), छगन भुजबळ(Chagan Bhujbal) आणि खासदार सुप्रिया सुळे(MP Supriya Sule) यांनी अनिल देशमुखांचे स्वागत केले. कथित 100 कोटी वसुली प्रकरणात अनिल देशमुखांना अटक झाली होती. तब्बल 14 महिन्यांनतर अनिल देशमुख जेलबाहेर आले आहेत. अनिल देशमुख जेलमधून बाहेर आले असले तरी मुंबई उच्च न्यायालयाने (Bombay High Court) त्यांना कडक अटी घातल्या आहेत. या अटींचे अनिल देशमुख यांना पालन करावे लागणार आहे. (Bombay High Court imposed strict conditions).
अनिल देखमुख यांच्या स्वागतासाठी राष्ट्रवादीच्या नेत्यांची फौज उभी होती. कार्यकर्त्यांची देखील मोठी गर्दी झाली होती. कार्यकर्त्यांनी देशमुख यांचे मोठ्या जल्लोषात स्वागत केले. देशमुख यांच्यावर फुलांची उधळण करत कार्यकर्त्यांनी त्यांना उचलून घेतले.
मुंबई हायकोर्टाने 12 डिसेंबरला अनिल देशमुख यांना जामीन मंजुर केला होता
मुंबई हायकोर्टाने 12 डिसेंबरला अनिल देशमुख यांना जामीन (Bail) मंजूर केला होता. पण अनिल देशमुख यांच्या जामिना विरोधात सीबीआयने सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती. सीबीआयची याचिका मुंबई हायकोर्टानं ( Bombay High Court) फेटाळून लावली. सीबीआयला मुदतवाढ देण्यास हायकोर्टाचा नकार दिला आहे. जामिनाला स्थगिती वाढवण्याची सीबीआयची मागणी फेटाळल्याने अनिल देशमुखाच्या जामीनाचा मार्ग मोकळा झाला. जवळपास सव्वा वर्षानंतर म्हणजेच तब्बल 14 महिन्यानंतर अनिल देशमुख तुरुंगाबाहेर आले आहेत. 100 कोटीच्या कथित वसुली प्रकरणात 2021 साली नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात त्यांना अटक करण्यात आली होती.
अनिल देशमुख यांना मुंबई उच्च न्यायालयाने घालतेल्या कडक अटींचे पालन करावे लागणार
जेल मधुन बाहेर आल्यानंतर अनिल देशमुख यांना मुंबई उच्च न्यायालयाने घालतेल्या कडक अटींचे पालन करावे लागणार आहे. अनिल देशमुखांना कोर्टाने काही अटी घातल्या आहेत. देशमुखांना विनापरवानगी मुंबईबाहेर जायला मनाई करण्यात आली आहे. मुंबई उच्च न्यायालयाने जामिनात घातलेल्या अटीनुसार, देशमुखांना कोर्टाच्या कार्यक्षेत्राबाहेर जाण्याकरता परवानगी घेणं बंधनकारक असणार आहे. मुंबईतील राहतं घर वगळता इतरत्र राहायला त्यांना मनाई करण्यात आली आहे. यामुळे देशमुख यांना नागपुर येथील आपल्या घरी, तसंच विधीमंडळ अधिवेशनात जाता येणार असे चित्र दिसत आहे.
का अटक झाली होती अनिल देशमुख यांना?
कथित 100 कोटी वसुली प्रकरणात अनिल देशमुख यांना अटक जाली होती. मुंबई पोलिस आयुक्त परमबीर सिंह आणि पोलिस निरिक्षक सचिन वाझे यांनी अनिल देशमुख यांच्यावर 100 कोटी खंडणी गोळा करण्यास सांगितल्याचा गंभीर आरोप केला होते. परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून देशमुख यांच्यावर पदाचा आणि अधिकाराचा गैरवापर केल्याचा आरोप देखील केला होता. तसेच बडतर्फ पोलीस निरीक्षक सचिन वाझे आणि इतरांना बार आणि रेस्टॉरंटमधून महिन्याला 100 कोटी वसूल करण्याचे टार्गेट दिल्याचा आरोपही करण्यात आला होता. या प्रकरणी देशमुखांची ईडीने मनी लाँड्रिंग आरोपांतर्गत चौकशी केली. 1 नोव्हेंबर रोजी ईडीने देशमुखांना अटक केली आणि त्यांची कोठडीत रवानगी करण्यात आली. तेव्हापासून देशमुख आर्थर रोड कारागृहात होते. 9 डिसेंबर 2021 रोजी ईडीने देशमुख आणि त्यांच्या दोन मुलांविरुद्ध पुरवणी आरोपपत्र आर्थिक गैरव्यवहार प्रतिबंधक कायद्या (पीएमएलए)अंतर्गत विशेष न्यायालयात दाखल केले होते.