मुंबई : प्रत्येकाने आपापला जिल्हा सांभाळा आणि राज्याचा स्कोअर वाढवा, असा सल्ला रोखठोक कार्यक्रमात काँग्रेस प्रदेश अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी स्वपक्षीय नेत्यांना सल्ला दिलाय. सुडाचे राजकारण नको, असा भाजपलाही सूचक इशारा दिलाय. त्याचवेळी ग्रामपंचायत निवडणुकीत काँग्रेसच नंबर एक असून भाजपचा दावा खोटा असल्याचे म्हटलेय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सगळ्या नेत्यांनी आपापला जिल्हा नीट सांभाळला तर राज्यात काँग्रेसचा स्कोअर वाढेल, असा यशाचा मंत्र नांदेडच्या विजयाचे शिल्पकार अशोक चव्हाण यांनी स्वपक्षीय नेत्यांना दिलाय. एखाद्याला संपवण्याचं सूडाचं राजकारण कुणीही करता कामा नये, अशी अपेक्षाही त्यांनी रोखठोक कार्यक्रमात बोलताना व्यक्त केली.


'काँग्रेस नंबर वन, भाजपची खोटी आकडेवारी'


ग्रामपंचायत निवडणुकीत काँग्रेसच नंबर एक असून भाजपने खोटी आकडेवारी दाखवत दिशाभूल केली आणि पंतप्रधान मोदींनी सर्वांचं अभिनंदन केलं. राज्य सरकारच्या कथनी आणि करणीमध्ये फरक असल्याची टीका राज्याचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केलीय. ते लोणी इथं काँग्रेस पक्षाच्या जिल्ह्यातील नवनियुक्त संरपंचांच्या सत्कार कार्यक्रम प्रसंगी बोलत होते. सोबतच त्यांनी कर्जमाफीच्या मुद्यावरूनही राज्य सरकारवर टीका केली. 


कर्जमाफीच्या मुद्यावरूनही राज्य सरकारवर विखे पाटील यांनी टीका केली. कर्जमाफीसंदर्भात सरकारनेच दिलेला शब्द सरकार पाळू शकलेलं नाही. सरकारनं शेतकऱ्यांची फसवणूक केलीय. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी जनतेची माफी मागावी, असं राधाकृष्ण विखे पाटलांनी म्हटले आहे.