मृत सचिनच्या पत्नीचा आक्रोश, सचू उठ ना!
डोंबिवलीला राहणारे ४० वर्षांचे सचिन कदम एलफिन्स्टनमधील हॉलमार्क लिफ्ट कंपनीत क्लार्क म्हणून कामाला होते.
मुंबई : डोंबिवलीला राहणारे ४० वर्षांचे सचिन कदम एलफिन्स्टनमधील हॉलमार्क लिफ्ट कंपनीत क्लार्क म्हणून कामाला होते. त्यांच्या मृतदेह पाहून सचू उठ ना, असा पत्नी सुचिताचा आक्रोश सुरू होता. आज सकाळी साडेआठ वाजता त्या पतीला डोंबिवली स्टेशनला सोडायला आल्या होत्या.
घरात नवरात्रीचे घट बसले असताना माझ्या घरात असे आक्रीत कसे घडू शकते, असा प्रश्नही त्या प्रत्येकाला विचारत होत्या. त्यांना समजावणे प्रत्येकाला जड जात होते. त्यांच्या पश्चात ७ वर्षांचा मुलगा, आई, पत्नी असा परिवार आहे. मुलाला डॉक्टर बनवण्याचे त्यांचे स्वप्न होते.