समुद्रात जलसमाधीचा तुपकरांचा इशारा; सरकारकडून मदतीची घोषणा
रविकांत तुपकर यांच्यासह हजारो शेतकरी बुलढाण्यावरुन मुंबईकडे रवाना झालेत. मात्र, ते मुंबईत पोहचण्याआधीच तुपकरांच्या इशा-यानंतर सरकारकडून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदतीची घोषणा करण्यात आली आहे.
कपिल राऊत, झी मिडिया, मुंबई : शेतकऱ्यांचे विविध प्रश्न आणि मागण्यांसाठी शेतकरी नेते रविकांत तुपकर(farmer leader Ravikant Tupkar) चांगलेच आक्रमक झाले आहेत. शेतक-यांच्या प्रश्नावर मुंबईतील समुद्रात जलसमाधी आंदोलन करण्याचा इशारा तुपरप यांनी दिला आहे. रविकांत तुपकर यांच्यासह हजारो शेतकरी बुलढाण्यावरुन मुंबईकडे रवाना झालेत. मात्र, ते मुंबईत पोहचण्याआधीच तुपकरांच्या इशा-यानंतर सरकारकडून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना(affected farmers) मदतीची घोषणा(government announced help) करण्यात आली आहे.
शिंदे-फडणवीस सरकारने तातडीने याकडे लक्ष देत महत्वाच्या घोषणा केल्या आहेत. बुलढाणा आणि वाशिम जिल्ह्याला 157 कोटींची मदत जाहीर करण्यात आली आहे. अतिवृष्टीग्रस्त शेतक-यांसाठी ही मदत जाहीर केली गेली आहे.
बुलढाणा आणि वाशिम जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे अतिवृष्टीमुळे प्रचंड नुकसान झाले आहे. या शेतकऱ्यांना सरकराने मदत जाहीर केली आहे.
दोन जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 157 कोटीची मदत सरकारकडून जाहीर करण्यात आली आहे. 3 हेक्टरच्या मर्यादेत जिरहित पिकांना साठी 13600 प्रती हेक्टर, बागायती पिकांच्या नुकसानीसाठी 27,000 प्रती हेक्टर, बहुवार्षिक पिकांसाठीर 36,000 प्रती हेक्टर अशी ही मदत केली जाणार आहे.
शेतकऱ्यांच्या प्रश्नावर रविकांत तुपकर यांनी अरबी समुद्रात आंदोलनाचा इशार दिला आहे. तुपकर यांच्या या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने ही तात्काळ मदत जाहीर केल्याची चर्चा आता रंगली आहे.
सरकारने आंदोलनाची धास्ती घेत ही मदत जाहीर केली आहे. ही मदत अत्यंच तुटपुंजी असल्याचा आरोप तुपकर यांनी केला आहे.