Chitra Wagh Vs Urfi Javed: मॉडेल उर्फी जावेद (Urfi Javed) नंतर आता तिच्या विरोधात तक्रार करणाऱ्या भाजप नेत्या चित्रा वाघ (Chitra Wagh) यांची पोलिस चौकशी होण्याची शक्यता आहे. महिला आयोगाच्या सूचनेनुसार पोलीस चित्रा वाघ यांचीही चौकशी करण्याची शक्यता असल्याची माहिती पोलिसांकडून मिळाली आहे. शनिवारी अंधेरी येथील अंबोली पोलीस ठाण्यात जवळपास दोन तास पोलिसांनी उर्फीची चौकशी केली होती. उर्फी नंतर आता चित्रा वाघ यांना चौकशीचा सामोरं जाव लागण्याची शक्यता आहे (Chitra Wagh Vs Urfi Javed). 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सार्वजनिक ठिकाणी अंगप्रदर्शन केल्याप्रकरणी भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी उर्फी  जावेद विरोधात  पोलिसात तक्रार दाखल केली होती. या तक्रारीची दखल घेत मुंबई पोलीस (Mumbai Police) आयुक्तांनी उर्फी जावेदच्या चौकशीचे आदेश दिले होते. अधेरी येथील अंबोली पोलीसांनी तिची चौकशी केली. 


दरम्यान, चित्रा वाघ त्यांच्या कार्यकर्त्यांसह आपल्यावर हल्ला करु शकतात, तेव्हा  चित्रा वाघ यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करावी अशी मागणी उर्फी जावेदनं महिला आयोगाकडे केली आहे. उर्फी जावेदनं शुक्रवारी राज्य महिला आयोगाच्या कार्यालयात जात चित्रा वाघ यांच्या चौकशीची विनंती केली. ट्टिटरच्या माध्यमांतून धमक्या देण्यासारखे प्रकार घडत असल्याचेही तिने महिला आयोगाकडे केलेल्या तक्रारीत म्हटले आहे. 


उर्फी जावेद आणि चित्रा वाघ यांच्यातील वाद पेटणार 


उर्फी जावेद आणि चित्रा वाघ यांच्यातील वाद आणखी पेटण्याची शक्यता आहे. चित्रा वाघ यांच्या तक्रारीनंतर मुंबई पोलीस ऊर्फीची चौकशी करणार आहेत. तर, उर्फीच्या तक्रारीबाबत महिला आयोगाने पोलिसांना पुढील कारवाईच्या सूचना दिल्या असल्याचे समजते. त्यानुसार, आता उर्फीला धमकावल्याप्रकरणी महिला आयोगाच्या सूचनेनुसार पोलीस चित्रा वाघ यांचीही चौकशी करण्याची शक्यता आहे. चित्रा वाघ धमकवतायत, असा आरोप उर्फीने केला होता. तर, मी धमकी दिली नाही, इशारा दिला, असं चित्रा वाघ यांनी म्हटल आहे. 


पोलिसांच्या चौकशीत उर्फी काय म्हणाली


मी भारताची सन्माननीय नागरिक आहे. मला माझ्या आवडीचे कपडे घालण्याचा, वागण्याचा बोलण्याचा अधिकार आहे. हा अधिकार मला राज्यघटनेने दिला आहे. मी जे कपडे घालते ते माझ्या आवडीने घालते.  माझे असे कपडे घालण्यावर माझ्या घरच्यांचा अजिबात आक्षेप नाही अस उर्फी म्हणाली.


मी जे कपडे घालते ते माझ्या प्रोफेशन आणि कामाचा एक भाग आहे. माझ्या कामाच्या हिशोबाने मी कपडे घालते. त्यावरून माझं फोटोशूट होत असत. कधी कधी कामाची इतकी घाई असते की कपडे बदलण्याचा वेळ मिळत नाही. यामुळे तसेच बाहेर पडावे लागते  त्याच वेळी कॅमेरे घेऊन आलेले लोक माझे फोटो काढतात. यानंतर हे फोटो व्हायरल होतात ते मी कसे थांबवू असा जवाब उर्फीने  दिल्याची माहिती पोलीस सूत्रांकडून मिळाली आहे.