मुंबई : शहरातील भेंडी बाजारमध्ये फ्रान्सचे राष्ट्रपती इमॅन्यूएल मॅक्रॉन यांच्या विरोधात आंदोलन करण्यात आले. मॅक्रॉनचे फोटो रस्त्यावर लावून पायदळी तुडवले. पैगंबरांचं व्यंग्यचित्र काढणाऱ्या मासिकाचे समर्थन केल्याबद्दल हे आंदोलन करण्यात आले. रझा अकादमीच्या मौलाना अब्बास यांनी हे आंदोलन केले. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मोहम्मद पैगंबरांचं अपमान करणाऱ्याला हीच शिक्षा योग्य असल्याचं ते म्हणाले. तर फ्रान्स हा भारताचा मित्र असल्याने फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांचा असा अपमान करणाऱ्या रजा अकादमीवर राज्यात बंदी घालावी, अशी मागणी भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी केली आहे. याबाबत मुंबई पोलीस योग्य तो निर्णय घेतील, अशी प्रतिक्रिया परिवहनमंत्री अनिल परब यांनी दिली. 


ठाण्यातही पडसाद


ठाण्यातील रस्त्यांवरही फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांचे पोस्टर चिकटवण्यात आले आहे. ठाण्यातील राष्ट्रवादीचे नगरसेवक यांनी याबाबत माहिती देत फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांनी तात्काळ माफी मागवी अशी मागणी केली आहे.


फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष एमॅन्युएल मॅक्रान यांच्याविरोधात मुस्लीम देशांतून आंदोलन होत आहे. मोहम्मद पैगंबर यांचे व्यंगचित्र काढण्याचे कृतीचे त्यांनी समर्थन केले होते. त्याविरोधात मुंबईतील काही भागांतूनही संताप व्यक्त केला जात आहे. मुंबईतील नागपाडा आणि भेंडीबाजार भागात मॅक्रान यांचे छायाचित्रे रस्त्यावर काढण्यात आले होते. त्यापैकी दोन पोस्टर सुरक्षित राहिले होते ते पोस्टर आज सकाळी मुंबई पोलिसांनी पाणी टाकून खरवडून काढून टाकले होते.



भाजपचा सवाल, अपमान का?


हेच फोटो ट्विटकरत भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते संबित पात्रा यांनी महाराष्ट्र सरकारला जाब विचारला होता. मुंबईच्या रस्त्यांवर फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांचा अपमान का करण्यात येत आहे, असा सवाल त्यांनी महाराष्ट्र सरकारला केला आहे. त्यानंतर आता ठाण्यातही अनेक रस्त्यांवर फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष एमॅन्युएल मॅक्रान यांचे पोस्टर चिकटवण्यात आले आहेत.