राज ठाकरेंनी रेखाटले व्यंगचित्र, मोदींवर साधला निशाणा
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी फेसबुकवर केलेल्या धमाकेदार एण्ट्रीतील एनर्जी कायम ठेवली आहे. गांधी जयंतीचे औचित्य साधत आज त्यांनी पुन्हा एकदा व्यंगचित्र रेखाटत पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जोरदार निशाणा साधला आहे. हे व्यंगचित्र ठाकरे यांनी आपल्या फेसबुक पेजवरही शेअर केले आहे.
मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी फेसबुकवर केलेल्या धमाकेदार एण्ट्रीतील एनर्जी कायम ठेवली आहे. गांधी जयंतीचे औचित्य साधत आज त्यांनी पुन्हा एकदा व्यंगचित्र रेखाटत पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जोरदार निशाणा साधला आहे. हे व्यंगचित्र ठाकरे यांनी आपल्या फेसबुक पेजवरही शेअर केले आहे.
राज ठाकरे यांनी फेसबुकवर सोमवारी (२ ऑक्टोबर) शेअर केलेले व्यंगचित्र हे एक शुभेच्छाचित्र आहे. पण, त्यातून नरेंद्र मोदी यांच्यावर चांगलाच निशाणा साधला आहे. या चित्रात ठाकरे यांनी महात्मा गांधी आणि नरेंद्र मोदी दोघे शेजारी शेजारी दाखवले आहेत. दोघांच्याही हातात एक एक पुस्तक आहे. महात्मा गांधी यांच्या हातातील पुस्तकावर MY EXPERTMENTS with TRUTH,असे लिहिले आहे. तर, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हातातील पुस्तकावर MY EXPERTMENTS with LIES असे लिहिले आहे. चित्रावर एकाच मातितील दोघे (TWO OF THE SAME SOIL!)अशी कॅप्शनही लिहीली आहे.
राज ठाकरे यांनी थेट नरेंद्र मोदी यांच्यावरच निशाणा साधल्यामुळे भाजपच्या गोटात आणि मोदींच्या चाहत्यांमध्ये अस्वस्थता वाढण्याची शक्यता आहे. राज ठाकरे यांनी व्यंगचित्राच्या माध्यमातून यापूर्वीही मोदींवर निशाणा साधला आहे. या आधी त्यांनी दाऊदला फरफटत आणणार अशा आशयाचे काढलेले मोदींचे व्यंगचित्र तूफान गाजले होते.