मुंबई : मध्य रेल्वे ( Central Railway ) मार्गावरील प्रवाशांची गारेगार प्रवासाची प्रतिक्षा अखेर संपली आहे. लवकरच मध्य रेल्वेवर एससी लोकल (AC Local)  सुरू होणार आहे चेन्नईच्या आयसीएफ रेल्वे कारखान्यातून मध्य रेल्वेच्या ताफ्यात पहिली वातानुकूलित लोकल ( Air-conditioned local)  इगतपुरी कारशेडमध्ये आता दाखल झाली आहे. ती पंधरा दिवसात मुंबईत दाखल होण्याची शक्यता आहे. मध्य रेल्वे मार्गावरील पहिली वातानुकूलित लोकल उंचीच्या मुद्द्यामुळे फक्त ट्रान्स हार्बर मार्गावर चालविण्यात येणार होती. परंतु हा उंचीचा प्रश्न निकाली निघाल्यामुळे एसी लोकल आता मध्य रेल्वेच्या मुख्य लाईन , ट्रान्सहार्बर आणि हार्बर मार्ग अशा तिन्ही मार्गावर धावणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मध्य रेल्वेवरील या एसी लोकलची उंची ४२७० मिमी असल्यामुळे प्रवाशांना एसी लोकलच्या गारेगार प्रवासाचा अनुभव घेता येणार आहे.मेन लाईन आणि हार्बर मार्गावरील पुलांच्या उंचीचा प्रश्न निर्माण झाल्याने मध्य रेल्वेची पहिली एसी लोकल ट्रान्स हार्बर मार्गावरील ठाणे ते नेरुळ-पनवेल मार्गावरच धावणार असे निश्चित करण्यात आले होते. परंतु चेन्नईतील रेल्वेच्या इंटिग्रेल कोच
फॅक्टरीमध्ये (आयसीएफ) मध्य रेल्वेला आवश्यक असणाऱ्या सर्व सुविधांसह एसी लोकल बनविण्यात आलेली आहे. 


ही लोकल भारत हेव्ही इलेक्ट्रिकल लिमिटेड ( भेल) कंपनीच्या बनावटीची असल्यामुळे तिच्या जास्त चाचण्या घेण्याची आवश्यकता नाही. मध्य रेल्वेवर ही लोकल आज दाखल झाल्यानंतर ही लोकल १५ दिवसांत प्रवाशांच्या सेवेत दाखल होण्याची शक्यता आहे या लोकलमध्ये आरामदायी आसन, आधुनिक हँडल, प्रवाशांना उभे राहण्यासाठी जास्त जागा, बॅग ठेवण्यासाठी नव्या बांधणीचा रॅक,टॉक बॅक सिस्टीम बसविण्यात आली आहे.त्यामुळे पश्चिम रेल्वे नंतर मध्य रेल्वेवरील प्रवाशांना एसी लोकलमधून प्रवास करता येणार आहे.