मुंबई : मध्य रेल्वेच्या (Central Railway) हार्बर मार्गावर (Harbor Railway) छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) ते पनवेल दरम्यान, आता एसी लोकल धावणार आहे. मध्य रेल्वेने तसा प्रस्ताव तयार केला आहे. तो रेल्वे बोर्डाच्या मंजुरीसाठी पाठवण्यात येणार आहे. दर दिवशी 10 फेऱ्यांचे नियोजन करण्यात येणार आहे. याआधी सुरु झालेल्या सीएसएमटी ते कल्याण आणि ठाणे ते वाशी ट्रान्स हार्बर मार्गावरील वातानुकूलित लोकलला बेताचाच प्रतिसाद मिळत आहे. मात्र, पनवेल ते सीएसएमटी या एसी लोकलला चांगला प्रतिसाद मिळण्याची शक्यता आहे. (Air-conditioned locomotives are now Will run on the Harbor Railway along with the Central Railway)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आधी पश्चिम रेल्वे मार्गावर एसी लोकल धावली. त्यानंतर पाठोपाठ मध्य रेल्वेवरही वातानुकूलित लोकल धावू लागली होती. मध्य रेल्वेने वातानुकुलित गाडी सोडण्याचा निर्णय घेतल्यानंतर या गाडीला चांगला प्रतिसाद मिळत आहे. दरम्यान, गतवर्षी कोरोनाच्या संकटामुळे लॉकडाऊन लागल्यानंतर रेल्वेसेवा बंद होती. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर लोकल रेल्वे पुन्हा रुळावर आली. त्यानंतर पुन्हा एससी लोकल सुरु करण्यात आली आहे.


मध्य रेल्वेच्या सीएसएमटी ते कल्याण मुख्य मार्गावर एसी लोकलचा शुभारंभ झाला आहे. कुर्ला स्थानकातून पहिली लोकल रवाना झाली होती. तर पश्चिम रेल्वेवर 25 डिसेंबर 2017 ला पहिली वातानुकूलित लोकल गाडी धावली. सामान्य 'भेल' लोकलमध्ये बदल करत त्याचे वातानुकूलित गाडीत रूपांतर करून ती चालविण्यात येत आहे. त्याचप्रमाणे रेल्वे प्रशासनाने सीएमएमटी ते कल्याण स्थानकादरम्यान 10 एसी लोकलच्या फेऱ्या सुरु करण्यात आल्या. एसी लोकलची सेवा सोमवार ते शनिवारी सुरु करण्यात आली. सर्वच स्थानकांवर या लोकलला थांबे देण्यात आले. आता हार्बर मार्गावर एसी लोकल सुरु करण्याचा प्रस्ताव आहे.


रविवारी पनवेल- वाशी मेगाब्लॉक


दरम्यान, हार्बर रेल्वे मार्गावर रविवारी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. 
देखभाल दुरुस्तीसाठी हा मेगा ब्लॉक घेतला जाणार आहे.  पनवेल- वाशी अप आणि डाउन हार्बर मार्गावर सकाळी ११.०५ ते संध्याकाळी ४.०५ मेगाब्लॉक असणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईसाठी पनवेलहून सकाळी १०.४९ ते सायंकाळी ४.०१ पर्यंत सुटणाऱ्या आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईहून सकाळी १०.०३ ते दुपारी ३.१६ पर्यंत पनवेल, बेलापूर डाउन हार्बर मार्गावरील सेवा रद्द करण्यात आली आहेत. प्रवाशांच्या सोयीकरिता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई - वाशी विभागात विशेष लोकल गाड्या चालविण्यात येतील.