मुंबई : मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर ग्राउंड हँन्डलिंग कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन पुकारलंय. काल रात्री १० वाजल्यापासून हे काम बंद आंदोलन सुरू आहे. या आंदोलनामुळे आंतरराष्ट्रीय हवाई वाहतूक सेवेवर आंदोलनाचा परिणाम झालाय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या आंदोलनात एअर इंडियाच्या एअर ट्रान्सपोर्ट कंपनीचे सुमारे ४५० कामगार आंदोलनात सहभागी झालेत. 


कर्मचाऱ्यांच्या बोनस आणि अन्य सुविधांच्या विविध मागण्यांसदर्भात कंपनी व्यवस्थापन निर्णय घेण्यास टाळाटाळ करीत असल्यानं आंदोलन पुकारलंय.


काय आहेत कामगारांच्या तक्रारी आणि मागण्या...


- व्यवस्थापनाद्वारे होणारी सततची त्रासदायक व अपमानास्पद वागणूक


- वर्षानुवर्षे रखडलेली पगारवाढ


- बोनस दिला जात नाही


- वाहतूक सुविधा दिली जात नाही


- महिला कर्मचाऱ्यांशी गैरवर्तन


- अवैध पद्धतीने कामगारांना कामावरुन काढून टाकणे


- नवीन नियुक्ती न करता निवृत्त झालेल्याच कामगारांना पुन्हा कामावर घेतले जाते