Air India : काय मी करु विंचू चावला! एअर इंडियाच्या विमानत महिला प्रवाशाला विंचवाचा डंख
नागपूरहून मुंबईला जाणाऱ्या एअर इंडियाच्या (Air India) विमानात एका महिला प्रवाशाला चक्क विंचवाने डंख मारला. या घटनेची माहिती कळताच क्रू मेंबर्सने मुंबई विमानतळ व्यवस्थापनला याची माहिती दिली. महिलेला उपचारासाठी रुग्णलयात दाखल करण्यात आलंय.
Air India : एअर इंडियाच्या विमानात (Air India Aircraft) एक धक्कादायक घटना समोर आली आहे. विमानातून प्रवास करणाऱ्या एका महिला प्रवाशाला चक्क विचंवाने डंख (Scorpion Bites) मारला. 23 एप्रिलला नागपूर ते मुंबई (Nagpur-Mumbai Flight) दरम्यानच्या एआय 630 या विमानात ही घटना घडली. नागपूर विमानतळावरुन विमान उड्डाण घेत असताना ही घटना घडली. विंचवाने डंख मारल्यानंतर महिलेने याबाबतची माहिती विमानातील क्रू मेंबरला दिली. क्रू मेंबरने तात्काळ मुंबई विमानतळ (Mumabi Airport) व्यवस्थापनला देत इमरजेंसी मेडिकल पथक सज्ज ठेवण्यास सांगतिलं. मुंबई विमानतळावर विमान लँड झाल्यानंतर तात्काळ त्या महिलेला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. या महिलेची प्रकृती ठिक असल्याचं सांगण्यात आलं आहे.
या घटनेवर एअर इंडिया व्यवस्थापनाने खेद व्यक्त केला आहे. यासंदर्भात एक कंपनीने एक पत्रही जारी केलं आहे. विमानातील प्रवाशाला विंचवाने डंख मारण्याची घटना अत्यंत दुर्देवी आणि दुर्मिळ आहे. विमान मुंबई विमातळावर लँड होताच डॉक्टरांकडून महिलेची तपासणी करण्यात आली त्यानंतर त्या महिलेला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. उपचारानंतर या महिलेला रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे, असं या पत्रात सांगण्यात आलं.
तसंच आमच्या टीमने सर्व नियमांचं पालन केलं आहे. कंपनीचे अधिकारी त्या महिलेबरोबर रुग्णालयात गेले तसंच डिस्चार्ज मिळेपर्यंत तिच्याबरोबर होते, अशी माहितीही कंपनीने आपल्या पत्रात दिली आहे. या घटनेनेनंतर एअर इंडियाच्या तज्ज्ञ पथकाने संपूर्ण विमानाचं निरिक्षण केलं. विमानात जंतू मारण्याचं औषध फवारण्यात आलं असून प्रवाशांना झालेल्या गैरसोयीबद्ल एअर इंडिया कंपनी दिलगीर व्यक्त करत असल्याचंही कंपनीने म्हटलंय.
विमानत याआधी घडलेला घटना
- एप्रिल 2022 मध्ये एअर इंडियाच्या विमानात उंदिर सापडला होता. यामुळे जम्मूला जाणारं विमानाला तब्बल अडीच तासांचा विलंब झाला होता.
- जानेवारी 2020 मध्ये वाराणसी विमानतळावर एअर इंडियाच्या देहरादूनला जाणाऱ्या विमानात उंदिर आढळल्यानंतर खळबळ उडाली आहे. त्यानतंर सर्व प्रवाशांना विमानातून उतरवण्यात आलं होतं. संपूर्ण विमानात शोध घेतल्यानंतरही उंदिर सापडला नाही. यानंतर सर्व प्रवाशांना 24 तासांसाठी एक हॉटेलमध्ये थांबवण्यात आलं. पुढच्या दिवशी एअर इंडियाच्या 319 विमानातून प्रवाशांना देहरादूनला रवाना करण्यात आलं.
- 15 जुलै 2022 मध्ये एअर इंडियाच्या बहरिन कोची विमानात पायलटच्या डेकवर एक छोटा पक्षी दिसला. विशेष म्हणजे विमान 37 हजार फूट उंचीवर असताना विमानात पक्षी दिसला. विमान कोचीला उतरवण्यात आल्यानंतर पक्षाला विमानातून बाहेर काढलं.