मुंबई : राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा दिला आहे. विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्याकडे अजित पवारांनी आपला राजीनामा सोपवला आहे. मात्र अजित पवार यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा का दिला? याचे कारण अजून गुलदस्त्यात आहे. अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांना देखील या राजीनाम्याविषयी माहिती नाही.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अजित पवार यांनी एका ओळीत राजीनामा दिला आहे. आपण आमदारकीचा राजीनामा देत आहोत, आणि त्याचा स्वीकार करावा, अशा एका ओळीत अजित पवारांनी हा राजीनामा दिली आहे.


अजित पवार यांच्या राजीनाम्याचा फॅक्स हा ५ वाजून ४० मिनिटांनी आला आहे. तसेच अजित पवार यांच्याशी आपले २ दिवसांपूर्वी फोनवर बोलणे झाले असल्याचंही हरिभाऊ बागडे यांनी म्हटलं आहे. 



तसेच अजित पवार यांनी दिलेला राजीनामा हा त्यांच्याच हस्ताक्षरात असल्याचं हरिभाऊ बागडे यांनी म्हटलं आहे. दुसरीकडे अजित पवार यांचा फोन मात्र नॉट रिचेबल आहे.