Ajit Pawar On Uddhav Thackeray :  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde) यांच्या बंडखोरीनंतर राज्यात नवा सत्ता निर्माण झाला आहे. एकनाथ शिंदेंच्या बंडखोरीमुळे शिवसेना पक्षात निर्माण झालेल्या फुटीबाबत राज्याचे विरोधीपक्ष नेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी भाष्य केले आहे. थेट उद्धव ठाकरे  (Uddhav Thackeray) यांचे नाव घेत अजित पवार यांनी खळबळजनक दावा केला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शिवसेनेतल्या फुटीवरून विरोधी पक्षनेते अजित पवारांनी सेना नेतृत्त्वाला जबाबदार धरले आहे. शिवसेनेतील फुटीची कल्पना उद्धवजींना सहा महिन्यांआधीच दिली होती. मात्र, आमदारांवर डोळे झाकून विश्वास ठेवला तिथेच गफलत झाल्याचे अजित पवारांनी म्हटले. 


 शिवसेना पक्षाअंतगर्त सुरु असलेल्या कुजबूज माझ्या कानावर आली होती. याबाबत मी उद्धव ठाकरे यांना सांगितले होते. पण त्यांनी हा आमचा पक्षाअंतर्गत प्रश्न असून एकनाथ शिंदेंसबोत चर्चा करु असे बोलून ते याकडे दुर्लक्ष करत होते असा दावा देखील अजित पवार यांनी केला आहे. 


एकनाथ शिंदे सह दहा बारा आमदार गेल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी सावध झाले पाहिजे होते. मात्र, त्यांनी इतर आमदारांशी संपर्क साधला नाही. उर्वरीत आमदार फुटू नये यासाठी उद्धव ठाकरे यांनी कोणतेच प्रय्तन केले नाहीत. आमदार गेल्यानंतर झालेल्या मोठ्या फुटीनंतरही उरलेल्या आमदारांना उद्धव ठाकरे यांनी खुशाल जाऊ दिलं ते व्हायला नको होतं असं म्हणत अजित पवार यांनी  सेना नेतृत्वावरही सवाल उपस्थित केला आहे.


एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीमुळे राज्यात राजकीय भूकंप


एकनाथ शिंदे  40 पेक्षा जास्त आमदारांना घेऊन सुरत गेले आणि महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा राजकीय भूकंप आला. उद्धव ठाकरे  (Uddhav Thackeray) यांना मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला. यानंतर राज्यातील महाविकास आघाडी सरकार रातोरात कोसळले. यानंतर एकनाथ शिंदे 40 आमदारांना घेऊन सुरत मार्गे थेट गुवाहाटीला गेले. मुंबईत परतल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी भाजपच्या पाठींब्यांने राज्यात नवे सरकार स्थापन केले. यानंतर एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाची तर देवेंद्र फडणवीस यांनी उप मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली.