दीपक भातुसे, झी मीडिया, मुंबई : अजित पवार पुन्हा उपमुख्यमंत्री होणार असल्याची माहिती मिळत आहे. अजित पवार अखेर उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार असल्याचं स्पष्ट झालंय. राजभवनावरून प्रसिद्ध झालेल्या यादीत अजित पवारांचा उपमुख्यमंत्री म्हणून उल्लेख करण्यात आला आहे. अजित पवार उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राज्यात महाविकासआघाडी सत्तास्थापनेची तयारी सुरु असताना महाराष्ट्रात मोठा राजकीय भूकंप पाहायला मिळाला होता. २३ नोव्हेंबर रोजी अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली होती. तर देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली होती.


२४ तारखेला निकाल आल्यानंतर कोणीही सरकार बनवू शकले नाही. गेली १ महिना केवळ चर्चाच सुरु होती. यातून कोणताही मार्ग निघत नव्हता. चर्चेला कंटाळून भाजपला पाठींबा देण्याचा निर्णय घेतल्याची प्रतिक्रिया अजित पवार यांनी दिली होती. त्यानंतर २३ नोव्हेंबर रोजी सकाळी ८ वाजता गुपचूप अजित पवारांनी शपथ घेतली होती. मात्र बहुमत सिद्ध करता न आल्याने हे सरकार अवघ्या ४ दिवसांत कोसळलं होतं.