Radhika Merchant Birthday Celebrate Video : मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचं लग्न मोठ्या जल्लोषात करण्यात आलं. या सोहळ्याचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. गेल्या अनेक महिन्यांपासून लग्नाचे अनेक कार्यक्रम परदेशापासून भारतात अनेक ठिकाणी करण्यात आले. आशियातील श्रीमंत कुटुंबातील या लग्नाने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. हॉलिवूडपासून बॉलिवूडपर्यंत खेळजगातपासून राजकारणापर्यंत सगळ्या क्षेत्रातील मान्यवर या सोहळ्याला आले होते. खरं तर हे लग्न सोशल मीडियावर खूप गाजलं. या सोहळ्याचे असंख्य व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या कुटुंबाची लाडकी आणि छोटी सूनबाई राधिका मर्चंट ही कुठल्या ना कुठल्या कारणाने चर्चेत असते. लग्नानंतर राधिका मर्चंट हिचा सासरी पहिला वाढदिवस असल्याने मोठ्या थाट्यामाट्याने साजरा करण्यात आला. अँटिलिया इथे त्यांच्या आलिशान घरात संपूर्ण कुटुंबासोबत वाढदिवस साजरा करण्यात आला. या पार्टीत बॉलिवूडचे अनेक स्टार्स उपस्थित होते. राधिकाच्या या ग्रँड बर्थडे सेलिब्रेशनचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यातील एक व्हिडीओ नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेत आहे. (Akash Ambani upset with Radhika Merchant birthday celebrate in antilia video viral )


 राधिका मर्चंटवर आकाश अंबानी नाराज? 


राधिका मर्चंटने लग्नानंतरचा पहिला वाढदिवस अँटिलियामध्ये तिच्या दोन्ही कुटुंबियांसोबत साजरा केला. या सेलिब्रेशनचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. या व्हिडीओमध्ये राधिकाने पांढऱ्या बॅकलेस टॉपसह लाल स्कर्ट घातलेला पाहिला मिळत आहे. पण या सोहळ्यात आकाश अंबानी अनंत अबांनीचा मोठा भाऊ राधिकावर नाराज आहे का? अशी चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे. नेमकं काय झालं आणि यामागील सत्य जाणून घेऊयात. 


झालं असं की, राधिकाचा वाढदिवस साजरा होत असताना तिथे मर्चंट आणि अंबानी कुटुंबातील सर्व सदस्य उपस्थितीत होते. राधिका केक कापताना तिच्या बाजूला नवरा अनंत अंबानी उपस्थितीत होता. केक कापल्यानंतर तिने केकचा पहिला घास अनंतला भरवला. त्यानंतर सासरे मुकेश अंबानी आणि त्यानंतर शेजारी उभे असलेले मर्चंट कुटुंब. आता ती केक भरवण्यासाठी पुढे सरकली तर तिथे आकाश अंबानी उभे होते. तिने केक भरवण्यासाठी तोंडावर केक नेला तर आकाश मागेसरकत नाही म्हणाला. 


आकाशचं हे कृत्य कॅमेऱ्यात कैद झालं आणि हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. त्यानंतर नेटकऱ्यांना आकाश नाराज आहे का असा प्रश्न पडलाय. पण थांबा हा व्हिडीओ नीट पाहा, आकाश राधिकाला केक खाण्यास नकार देतो कारण त्याचा बाजूला अंबानी कुटुंबाची ज्येष्ठ त्यांची आजी कोकीलाबेन अंबानी आहेत. आकाश राधिकाला म्हणाला पहिले बा यांना केक खायला दे. राधिकाने आकाश यांचं म्हणं ऐकलं आणि बा ला केक खायला दिला. दरम्यान अंबानी कुटुंबातील प्रत्येक सदस्यांचं एकमेकांशी खूप छान संबंध आहे. आकाश हे राधिकाचे भावोजी असलेली तरी त्यांच्यामध्ये मैत्रीपूर्ण नातं आहे. एकमेकांसोबत मजा मस्ती करतानाचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. 



खरं तर ज्या लोकांना हे लक्षात आलं अशा नेटकऱ्यांनी आकाशचं खूप कौतुक केलंय. यूजर्स आकाशला सज्जन म्हणत आहेत. दरम्यान ओरी, अनन्या पांडे, शिखर पहाडिया, जान्हवी कपूर, अर्जुन कपूर, महेंद्र सिंह धोनी यांच्यासह अनेक स्टार्सनी पार्टीला हजेरी लावली होती.