मुंबई : हिवाळ्यात पालेभाज्या चांगल्या मिळतात या उद्देशाने त्या अनेकदा आवडीने खाल्या जातात. मात्र 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आता थोडे व्हा अलर्ट.  कारण सोशल मीडियावर व्हायरल होतोय हा व्हिडिओ. ज्यामध्ये पालकच्या पानांसारखाच दिसणारा हा किडा दिसत आहे. या व्हिडिओ मध्ये दावा केला जात आहे की आपण भाजीपाल्यामध्ये किडे पण खात आहोत. सोबतच बोलले जात आहे की पालकाच्या भाजीसारखे तोंड असलेला हा कीडा पालक मधून आपल्या पोटात जात आहे. हे तुम्हाला थोडं विचित्र वाटेल पण हे खरं आहे. त्यामुळे पालक भाजी घेताना थोडे सावधान. 


या व्हिडिओतील किड्याबद्दल पर्यावरण अभ्यासकांना विचारलं असता त्यांनी सांगितले की पानासारखा दिसणारा हा किडा डोळ्याचा धोका नाही ये. हे बिलकुल सत्य आहे आणि या किड्याचे नाव लिफमाईनर्स आहे. हा किडा पानामध्ये आपले घर करून राहतो.  त्यामुळे या किड्याला लिफ इंसेक्ट व वॉकिंग लीफ च्या नावाने सुध्दा ओळखले जाते.



पालक आणि साग मध्ये अशा प्रकारचे किडे सहसा आढळून येतात. पालक च्या या किड्यांचे घर सुद्धा व जेवनसुद्धा असते. पालक शिवाय अजून बऱ्याच वस्तुमध्ये हा किडा आढळून येतो. साग आणि भाजीपाल्याची कल्पना आपण बिना बॅक्टेरिया आणि बिना किड्यानी करू शकत नाही. प्रत्येक व्यक्तीची जबाबदारी असते की आपण भाजीपाला चांगल्या प्रकारे साफ करून खायला हवा. त्यांनी हे पण सांगीतले की हा किडा भारत, ऑस्ट्रेलिया आणि आफ्रिका या देशात आढळुन येतो. 


या एकाच किड्याच्या अनेक प्रजाती आहेत. झाडांच्या मुळ्यामध्ये सुद्धा असे किडे असतात. विषेश म्हणजे हा कीड वातावरणानुसार आपले रूप आणि रंग बदलू शकतो. रंग रूप बदलण्याची ही प्रक्रिया स्वराक्षणासाठी केली जाते.