मुंबई : महर्षी दयानंद स्पोर्ट्स क्लब आणि बीके फाऊंडेशनच्या वतीने 'अखिल भारतीय कबड्डी स्पर्धा' या सोहळ्याचे उद्घाटन नुकतेच खा. गोपाळ शेट्टी  यांच्याहस्ते झाले.  बोरिवलीच्या अरुण कुमार वैद्य मैदानावार हा कार्यक्रम पार पडला.


खेळाडूंचा जोश


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भारतीय जनता पक्ष आयोजित पाच दिवसीय कबड्डी सामने १३ ते १७ फेब्रुवारीमध्ये रंगणार असून पहिल्याच दिवशी भारताच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या खेळाडूंमध्ये चांगला जोश पहायला मिळाला


४२ संघ सहभागी 


या कबड्डी सामन्यामध्ये महिला आणि पुरुष असे दोन गट आहेत. भारतातील ४२ संघ यात सहभागी झाले आहेत. दिल्ली, हैदराबाद, फरीदाबाद, चेन्नई, पंजाब, चेन्नई, तमिळनाडू, नागपुर, मुंबई आणि पुणे अशा विविध भागातून आलेल्या खेळाडूंमध्ये चांगली चुरस रंगणार आहे.


या सर्व संघांमध्ये १३, १४ आणि १५ फेब्रुवारी रोजी स्पर्धा होणार असून १६ आणि १७ फेब्रुवारीला अंतिम सामने होणार आहे.


या सामन्यांमध्ये राष्ट्रीय आणि अंतरराष्ट्रीय स्तरावरील खेळाडू खेळणार असून प्रो कबड्डीमधील खेळाडूदेखील सहभागी आहेत. अॅम्युचर कबड्डी फेडरेशन ऑफ इंडिया, मुंबई उपनगर कबड्डी असोसिएशन, महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशन आणि महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष यांच्या वतीने हे सामने भरवण्यात आले आहे.