मुंबई : विधिमंडळ नेतेपदाचे अधिकार आता प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांच्याकडे देण्यात आले आहेत. शिवाय अजित पवार यांना व्हिप काढण्याचा अधिकार नाही आसा निर्णय देखील राष्ट्रवादीच्या बैठकीत घेण्यात आला. त्याचप्रमाणे आता अजित पवारांबाबत निर्णय घेण्याचे अधिकार शरद पवार आणि जयंत पाटील यांच्याकडे असतील. अजित पवार यांनी आज सकाळी ८ वाजता उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर राज्याच्या राजकाणात चांगलीच खळबळ माजली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सध्या मुंबईत राष्ट्रवादीची बैठक पार पडत आहे. या बैठकींमध्ये शरद पवार आमदारांमध्ये विश्वास निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. तर अजित पवार यांच्यावर कारवाई करण्यात येईल असे सांगण्यात येत आहे. तर स्थिर सरकार जोपर्यंत राज्याला मिळत नाही तोपर्यंत विधिमंडळ नेतेपदाचे अधिकार आता प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांच्याकडे देण्यात आले आहेत.  


उपमुख्यमंत्री अजित पवार 
महाराष्ट्रात सत्तास्थापनेसाठी गेला महिनाभर चर्चा सुरू होती. नको त्या गोष्टींची मागणी वाढू लागली होती. त्यामुळे, आत्ताच जमत नसेल तर पुढे सरकार कसं चालेल? राज्याला स्थिर सरकारची गरज आहे, असं मला वाटलं त्यामुळे भाजपला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतल्याचं उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर अजित पवार यांनी म्हटलंय.