नवी दिल्ली : काश्मीरमधील अनंतनागमध्ये अमरनाथ यात्रेतील भाविकांच्या बसवर दहशतवाद्यांनी हल्ला केलेल्या हल्ल्यात ७ जण ठार झाले आहेत. या महाराष्ट्रातील पालघरच्या दोन भाविकांचा समावेश आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दरम्यान या घटनेच्या निषेधार्थ विरोधकांनी आज जम्मू-काश्मीर बंदची हाक दिली आहे. ​अमरनाथ यात्रेवरील दहशतवादी हल्ल्यात पालघरच्या डहाणूमधील रहिवाशी निर्मलाबेन ठाकोर आणि उषा सोनकर ठार झाले आहेत. 


तसेच खबरदारीचा उपाय म्हणून जम्मू, रामबन, सांबा, कठूआ आणि उधमपूर येथे हायअॅलर्ट जारी करण्यात आला आहे. केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनीही आज सकाळी १० वाजता तातडीची बैठक बोलावली आहे. परिस्थितीचा आढावा घेणार आहे. 


दहशतवाद्यांनी अमरनाथ यात्रेवर हल्ला केला असला तरी दहशतवाद्यांना भीक न घालता ही यात्रा सुरूच राहणार असल्याचं मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांनी स्पष्ट केले आहे. तसेच यात्रेसाठी दुसरा गट रवाना करण्यात आला आहे.