मुंबई : संपूर्ण देश आज स्वातंत्र्याचा अमृतोत्सव साजरा करत आहे. लाल किल्ल्यावरून देशाच्या कानाकोपऱ्यात तिरंगा फडकवला जात आहे. वृद्ध, लहान मुले, सर्वच जण स्वातंत्र्य उत्सव जल्लोष साजरा करत आहेत. देशातील प्रत्येक नागरिक आज अमृतोत्सव साजरा करत आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून देखील प्रत्येक जण देश प्रेम व्यक्त करताना दिसत आहे. अशात अंबानी कुटुंबाने देखील अमृतोत्सव मोठ्या जल्लोषात साजरा केला आहे. देशातील सर्वात श्रीमंत कुटुंबांपैकी एक असलेल्या अंबानी कुटुंबाचा एक व्हिडिओही समोर आला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

व्हिडीओमध्ये रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी आणि त्यांची पत्नी नीता अंबानी देखील त्यांच्या कर्मचाऱ्यांसोबत स्वातंत्र्य दिन साजरा करताना दिसत आहेत. सर्वजण अभिमानाने तिरंगा फडकावत आहेत. महत्त्वाचं म्हणजे अंबानींच्या नातवानंही तिरंगा फडकवला आहे. सध्या अंबानी कुटुंबचा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. 


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

)


मुकेश यांचा नातू पृथ्वी अंबानी व्हिडीओमध्ये कैद झाला आहे. मुकेश अंबानी यांनी नातू पृथ्वीला मांडीवर घेतलं आहे. नितू अंबानी तिरंगा फडकवत असताना  पृथ्वीने त्यांच्याकडून तिरंगा घेतला आणि दोघे मिळून तिरंगा फडकवू लागले. सध्या त्यांच्या व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.