मुंबईच्या रस्त्यांवर दिसला अंबानी परिवाराचा शाही अंदाज! VIDEO का होतोय व्हायरल?
Akash Ambani-Shloka Ambani & Isha Ambani: अंबानी घराण्यातील तरुण पिढी मुंबईच्या रस्त्यांवर सर्वसामान्यांना पाहता आली. यावेळी ते एका अलिशान कारमध्ये बसले होते.
Akash Ambani-Shloka Ambani & Isha Ambani: देशातील सर्वात श्रीमंत व्यक्तींमध्ये मुकेश अंबानी अग्रस्थानी आहेत. अंबानी परिवाराचे उत्पन्न, राहण्याचे ठिकाण, खाण्याचे पदार्थ, हॉटेल, पेहराव या सर्व गोष्टींची समाज माध्यमांमध्ये चर्चा सुरु असते. प्रत्येकांच्या त्यांच्या आयुष्यातील गोष्टी ऐकून घेण्यात रस असतो. अंबानी घराण्यातील तरुण पिढी मुंबईच्या रस्त्यांवर सर्वसामान्यांना पाहता आली. यावेळी ते एका अलिशान कारमध्ये बसले होते. त्यांचे फोटो, व्हिडीओ सध्या सोशल मीडिायत चर्चेत आहेत.
मुकेश अंबानी यांची मुले आकाश-अनंत अंबानी आणि मुलगी ईशा अंबानी अनेकदा राजेशाही स्टाईलमध्ये दिसतात. आता त्यांचा एक व्हिडिओ समोर आला आहे. ज्यामध्ये मुकेश अंबानी यांची मुले आकाश आणि ईशा अंबानी मुंबईच्या रस्त्यावर अत्यंत महागड्या रोल्स रॉयस कारमध्ये फिरताना दिसत आहेत. त्यांच्या व्हिडीओची एक रील इस्ट्राग्रामवर शेअर केली जात आहे. या रिलमध्ये आकाश आणि ईशा, दोघे भाऊ आणि बहीण कारच्या पुढच्या सीटवर बसलेले दिसत आहेत. आकाशची पत्नी श्लोका अंबानी मागच्या सीटवर बसून राईडचा आनंद घेताना दिसत आहे.
पाहा व्हिडीओ
अंबानी कुटुंबातील मुले दिसली आनंदात
रीलमधील व्हिडीओ हा कोणत्या भागातील आहे हे सांगता येत नाही. तरी हा व्हिडीओ वरळी, मरीन लाईन्स भागातील असावा असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. या व्हिडीओमध्ये आकाश आणि ईशा अंबानी रात्रीच्या मुंबईचा आनंद लुटताना स्पष्टपणे दिसत आहेत. श्लोका अंबानी देखील खूप एन्जॉय करत आहेत. ज्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून ही रील शेअर करण्यात आली आहे त्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे की...'अंबानींची जुळी मुले- आकाश आणि ईशा अंबानी एक जबरदस्त रोल्स रॉयस चालवत आहेत. ही लक्झरीची पुढची पातळी आहे. स्वप्न जगण्याचा हा आणखी एक मार्ग आहे. वेगळा दिवस दिसतोय.' असे कॅप्शनमध्ये लिहिले आहे.
रिलायन्स इंडस्ट्रीजचे मालक मुकेश अंबानी आणि त्यांचे कुटुंबाची शाही जीवनशैलीसाठी ओळखले जाते. अंबानी कुटुंबाच्या अनेक कार्यक्रमामध्ये हे पाहायला मिळते. कौटुंबिक किंवा अगदी खासगी कार्यक्रमांमध्येदेखील मुकेश अंबानी, नीता अंबानी, आकाश अंबानी, ईशा अंबानी पिरामल, अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या विलासी जीवनाची झलक पाहायला मिळते.
अलीकडेच 12 जुलै रोजी अनंत अंबानींच्या लग्नादरम्यान संपूर्ण कुटुंबाचा रॉयल लुक आणि आलिशान जीवनशैली संपूर्ण जगाने पाहिली. याची सगळीकडे चर्चादेखील झाली.