मुंबई : आपल्या देशात कित्येक अशी शहरे आहेत, जेथे नेहमीच ट्रॅफिक जाम असते. अशात जर एखाद्या व्यक्तीला महत्तवाचे काम आले असेल, तर तो अडकलाच म्हणून समजा. एवढेच काय तर  अगदी रुग्णवाहिकेला सुद्धा रस्ता मिळणे कठीण होते. पण तुम्ही सोशल मीडियावरचा तो व्हीडिओ पाहिलात का? त्या व्हीडिओमध्ये इतक्या ट्रॅफिकमध्ये हा रुग्णवाहिका चालक ज्या प्रकारे गाडी चालवत आहे, हे पाहून तुमचा तुमच्या डोळ्यांवरती विश्वासच बसणार नाही.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

त्या रुग्णवाहिका चालकाचे असे कौशल्य पाहुन लोकांकडून या व्हीडिओला सोशल मीडियावरती खूप शेअर केले गेले आणि काही तासातच हा व्हीडिओ व्हायरल देखील झाला, असे म्हटले जात आहे की, हा व्हीडिओ केरळचा आहे आणि रुग्णवाहिका चालक रुग्णालयाच्या दिशेने रुग्णाला घेऊन जात आहे. हा व्हीडिओ पाहिल्यानंतर प्रत्येकजण चकीत झाले आहेत.



या व्हीओवर लोकं वेगवेगळ्या प्रकारचे कमेंट करत आहेत. काही लोक असे म्हणत आहेत की, जर रुग्ण आत असेल आणि या वेगाने रुग्णवाहिका चालत असेल तर त्या रुग्णाचे काही खरे नाही, तो रुग्ण कदाचित खाली पडला असावा. तर काही लोक या वेगाने कोणालाही हानि न पोहचवता रुग्णवाहिका चालवण्यामुळे ड्रायव्हरचे कौतूक देखील करत आहेत.


लोकं काहीही बोलत असले तरीही, या रुग्णवाहिका चालकाला त्या रुग्णाचे प्राण वाचवण्यासाठी आपले बेस्ट देण्याची इच्छा होती, जेणेकरून रुग्णाची आयुष्य योग्य वेळी वाचू शकेल हे सिद्ध होत आहे.