अमित शहा-लता मंगेशकर भेट रद्द
भाजप अध्यक्ष अमित शाहांची भारतरत्न लतादीदींशी नियोजित भेट रद्द करण्यात आलीय.
मुंबई : भाजप अध्यक्ष अमित शाहांची भारतरत्न लतादीदींशी नियोजित भेट रद्द करण्यात आलीय. लतादीदींना अस्वस्थ वाटू लागल्यामुळे ही भेट रद्द करण्यात आलीय. मात्र अमित शाहा यांनी फोनवरून चर्चा केल्याची माहिती लतादीदींनी ट्विटरवरून दिलीय. अन्नातून विषबाधा झाल्यामुळे लता मंगेशकर यांना अस्वस्थ वाटू लागलं, त्यामुळे ही भेट होऊ शकत नसल्याचं लतादीदींनी ट्विटवरून सांगितलंय. भाजप अध्यक्ष अमित शहा हे मुंबई दौऱ्यावर आहेत. संपर्क अभियान म्हणून अमित शहा दिग्गजांच्या भेटी घेत आहेत. दुपारी शहांनी माधुरी दीक्षितची भेट घेतली आणि तिला राज्यसभा खासदारकीची ऑफर दिली, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. माधुरी ही ऑफर स्वीकारते का हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. दरम्यान भाजप अध्यक्ष अमित शहा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंचीही भेट घेणार आहेत. गेल्या काही दिवसांमध्ये ताणले गेलेले शिवसेना-भाजपचे संबंध आणि शिवसेनेनं केलेली स्वबळाची भाषा हे पाहता ही भेट महत्त्वाची मानली जात आहे.