दीपक भातुसे, झी मीडिया, मुंबई : नारायण राणे यांच्या भाजपा प्रवेशाची पावले सकारात्मक दिशेने पडू लागली आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी दिल्लीत अमित शहा आणि मोदी यांच्याशी चर्चा केल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नारायण राणे यांच्याशी चर्चा केली. राणे आणि फडणवीस यांच्यात झालेली चर्चा सकारात्मक असून त्यामुळे राणेंचा भाजपा प्रवेश लवकरच होण्याची चिन्हं आहेत.


येत्या २७ तारखेला अमित शहा मुंबई दौऱ्यावर आहेत. या दिवशी राणे आणि अमित शहा यांची भेट होण्याची शक्यता आहे. काही दिवसांपूर्वी नारायण राणे यांनी अमित शहांची गुप्त भेट घेतल्याची चर्चाही होती.


सूत्रांच्या माहितीनुसार, राणे यांच्या भाजपा प्रवेशाबाबत २७ तारखेच्या आधी बोलणी अंतिम झाली तर राणेंचा २७ तारखेला प्रवेश होऊ शकतो. अन्यथा हा प्रवेश काही दिवस पुढे जाण्याची शक्यता आहे.


मात्र, राणेंचा भाजपा प्रवेश आता निश्चित झाला असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपा अध्यक्ष अमित शहा हे या प्रवेशाबाबत सकारात्मक आहेत. फक्त आता राणेंच्या प्रवेशाचा मुहूर्त २७ ऑगस्ट की काही दिवस पुढे जाणार एवढेच निश्चित व्हायचे आहे.