मुंबई : भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची मातोश्रीवर जाऊन भेट घेणार आहेत. या भेटीबाबत उत्सुकता शिगेला पोहोचलेय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राष्ट्रपती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अमित शाह शिवसेना पक्षप्रमुखांची भेट घेणार आहेत. 


याशिवाय विविध मुद्यावरुन शिवसेना आणि भाजपमध्ये होत असलेल्या आरोप प्रत्यारोपांच्या पार्श्वभूमीवर या बैठकीला विशेष महत्त्व आहे. 


शिवसेनेची कोणत्या मुद्यावर नाराजी असल्यास ती दूर करु असंही शाह यांनी म्हटले आहे.  


दरम्यान, शाह यांनी स्वबळावर निवडणुकीसाठी तयार असल्याचे म्हटले होते. तर दुसरीकडे स्वतंत्र विदर्भाबाबत शिवसेनेची नाराजी दूर करु, असेही संकेत दिलेत. त्यामुळे या भेटीत काय चर्चा होणार याची उत्सुकता आहे.