मुंबई : ठाकरे कुटुंब कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असतं. सध्या चर्चा रंगत आहे मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे (amit thackeray)  यांच्याबद्दल. नुकताच अमित ठाकरे यांना  मोस्ट स्टायलिश पॉलिटिशन पुरस्कारानं गौरवण्यात आलं. पुरस्कार स्वीकारल्यानंतर अमित यांनी मान्यवरांचे आभार मानले. यावेळी त्यांनी स्वतःच्या भावना देखील व्यक्त केल्या. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अमित ठाकरे म्हणाले, 'माझ्या आयुष्यातील हा पहिला पुरस्कार आहे. 4 दिवसांपूर्वी मला पुरस्कार देत असल्याचं कळालं. तेव्हा माझ्या मनात प्रश्न आला, यासाठी नॉमिनीज कोण आहे? असे कोण स्टायलिश पॉलिटिशन्स आहेत ज्यांच्यातून मला निवडून हा पुरस्कार देण्यात आला.' 



ते पुढे म्हणाले, 'पण इथे आल्यावर कळालं नॉमिनीज नाहीत. पुरस्कार स्वीकारल्यानंतर अमित ठाकरे यांनी सर्वांचे आभार देखील मानले. पुरस्कार स्वीकारल्यानंतर अमित ठाकरे यांना एक प्रश्न विचारण्यात आला. 


'तुमच्यात आणि राज ठाकरेंमध्ये काय फरक आहे?' यावर अमित ठाकरे म्हणाले, 'My Style is Better ' असं उत्तर दिल्यानंतर जमलेल्यांमध्ये एकच हाशा पिकला.