मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे चिरंजीव अमित आणि प्रसिद्ध बाल रोगतज्ञ डॉ. संजय बोरुडे यांची कन्या मिताली यांचा आज साखरपुडा झाला.


५ वर्षांपासून एकत्र


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राज ठाकरे आणि शर्मिला यांच्या लग्नाच्या वाढदिवसाचं औचित्य साधत अमित आणि मिताली यांचा साखरपुडा झाला. अमित-मिताली गेली पाच वर्षे एकमेकांच्या प्रेमबंधात आहेत. महाविद्यालयीन शिक्षणावेळी एकमेकांशी सूर जुळले होते. अमित वाणिज्य पदवीधर तसेच बिझनेस मॅनेजमेंटचे शिक्षण तसेच व्यंगचित्रकार आणि मनसे राजकारणात सक्रिय आहे. तर मिताली फॅशन डिजायनिंगच्या क्षेत्रात कार्यरत आहे. अमित नुकताच एका दुर्धर आजाराशी लढून सुखरूप बाहेर आला.



राजकारणात सक्रिय होण्याची शक्यता


महालक्ष्मी रेसकोर्सवर असलेल्या टोड्स हॉटेलमध्ये अमित-मितालीचा साखरपुडा झाला. हा अत्यंत खाजगी सोहळा असेल. अमित लवकरच मनसेच्या सक्रिय राजकारणात पूर्णपणे दिसण्याची शक्यता आहे. तसंच लवकरच मनसे विद्यार्थी सेनेच्या अध्यक्ष पदाची सूत्र अमित यांच्याकडे येण्याची शक्यता आहे.


मोजक्या जणांनाच आमंत्रण


कुटुंबातील मोजक्या जणांनाच साखरपुड्यासाठी आमंत्रण देण्यात आले असून स्मिता ठाकरे उपस्थित आहेत. खाजगी व छोटेखाना कार्यक्रम सुरु असून साडे अकरा पासून धार्मिक विधींना सुरुवात झाली आहे.