आता प्रतीक्षा बंगल्यावर Amitabh Bachchan यांची मालकी नाही; मुलाला सोडून `या` महिलेला दिला ताबा, अभिषेक बच्चनला वाटेला...
Amitabh Bachchan Pratiksha Bungalow : बिग बी त्यांच्या कुटुंबावर खूप प्रेम करतात. श्वेता बच्चन नंदा आणि अभिषेक बच्चन ही दोन्ही मुलं त्यांच्या खूप जवळ आहे. अशातच प्रतीक्षा बंगल्याबद्दल मोठी अपडेट समोर आली आहे. आता प्रतीक्षा बंगल्यावर अमिताभ यांची मालकी राहणार नसून तो एका महिलेला देण्यात आला आहे.
Amitabh Bachchan Pratiksha Bungalow : हिंदी चित्रपटसृष्टीतील मेगास्टार अमिताभ बच्चन यांच्या मालमत्तेबद्दल मोठी अपडेट समोर आली आहे. अमिताभ बच्चन यांच्या जुहूमधील प्रतीक्षा बंगल्यावर आता त्यांची मालकी नसणार आहे. मुलगा अभिषेक बच्चन आणि सून ऐश्वर्या राय बच्चन यांना सोडून बिग बी आणि जया बच्चन यांनी या बंगल्याची मालकी एका महिलेला दिली आहे. ही महिला दुसरी तिसरी कोणी नसून त्यांची लेक श्वेता नंदा बच्चन आहे. अमिताभ आणि जया बच्चन यांनी आपल्या लेकीला दिवाळीचं सर्वात महागडे गिफ्ट दिलं आहे. (Amitabh Bachchan no longer owns Pratiksha Bungalow amitabh jaya bachchan gifts his juhu bungalow prateeksha to daughter shweta nanda)
आलिशान बंगल्याची किंमत काय?
मिळालेल्या माहितीनुसार बच्चन कुटुंबाने या कामासाठी एकूण 50.65 लाख रुपये मुद्रांक शुक्ल भरलंय. सध्या या बंगल्याची किंमत बाजारात 50.63 कोटी एवढी आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार हा बंगल्या ज्या दोन जमिनींवर बांधण्यात आला आहे. त्यापैकी एक 9,585 स्क्वेअर फूटमध्ये हा बंगला आहे. ही जागा अमिताभ आणि जया बच्चन यांच्या संयुक्त मालकीची आहे. तर त्यातील दुसरी जमीन 7,255 स्क्वेअर फूटवर अमिताभ यांची एकट्याच्या नावावर होती.
'प्रतीक्षा' बिग बींच्या हृदयाचा जवळ!
जुहूमधील प्रतीक्षा हा बंगला अमिताभ बच्चन यांच्या हृदयाच्या खूप जवळ आहे. त्यांचे वडील हरिवंश राय यांनी त्यांच्या कवितेपासून प्रेरित होतं या बंगल्याचे नाव प्रतीक्षा ठेवलं होतं. कवितेची ओळ अशी होती, स्वागत सबके लिए यहां, पर नहीं किसी के लिए प्रतीक्षा...।
बिग बींचं वर्कफ्रंट
शतकातील मेगास्टार अमिताभ बच्चन हे 81 वर्षांचे आहेत. तर त्यांच्या कामाबद्दल बोलायचं झालं तरी 'गणपत' चित्रपटात ते नुकतेच झळकले आहेत. याशिवाय ते 'सेक्शन 84' आणि 'कल्की 2898 एडी' मध्ये दिसणार आहात. तर सध्या ते कौन बनेगा करोडपतीच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येत असतात.