Amol Kolhe News: राष्ट्रवादीचे अनेक बडे नेते भाजपच्या (BJP) वाटेवर असल्याची चर्चा सुरु आहे. त्यातच राष्ट्रवादीचे खासदार आणि अभिनेते डॉ.अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांनी ट्विटरवर एक फोटो शेअर केला आहे. ज्यामुळे अमोल कोल्हे भाजपच्या वाटेवर असल्याची  चर्चा रंगली आहे. अमोल कोल्हे यांनी पुस्तक वाचतानाचे दोन फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमुळे चर्चेला उधाण आले आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पुस्तक दिनानिमित्त  अमोल कोल्हे यांनी ट्विटरवर एक पोस्ट शेअर केली आहे. पोस्ट एकच असलेली दोन वेगवेगळ्या फोटोंमुळे आणि त्याखालील कॅप्शनमुळे अमोल कोल्हे भाजपच्या वाटेवर तर नाहीत ना? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. 


काय आहे अमोल कोल्हे यांची पोस्ट


पुस्तक दिनानिमित्त अमोल कोल्हे यांनी पुस्तक वाचतानाचे दोन फोटो शेअर केले आहेत. पहिल्या फोटोत अमोल कोल्हे शरद पवारांचं 'नेमकचि बोलणे' हे पुस्तक वाचताना दिसत आहेत. तर, दुसऱ्या फोटोत त्यांच्या हातात  'द न्यू बीजीपी' हे पुस्तकं दिसत आहे.  'विचारधारा कोणतीही असो, ती समजून घेण्यासाठी पुस्तकांसारखा चांगला गुरु कोण. वाचाल तर वाचाल! जागतिक 'पुस्तक' दिनाच्या शुभेच्छा!!' असं कॅप्शन अमोल कोल्हे यांनी दिले आहे. 


वेगवेगळ्या पक्षांची विचारधारा मांडणारी ही दोन पुस्तक आणि विचारधारा समजून घेण्याची कॅप्शन यामुळे अमोल कोल्हे यांना    नेमकी कुणाची विचारधारा समजून घ्यायची आहे? असा प्रश्न देखील उपस्थित झाला आहे. या ट्विटमधून अमोल कोल्हे यांना नेमकं काय म्हणायचे आहे? ते भाजपच्या वाटेवर तर नाहीत ना? अशा अनेक प्रश्नांवर राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंगली आहे.



अमोल कोल्हे यांनी घेतली होती अमित शहा यांची भेट 


अमोल कोल्हे भाजपच्या वाटेवर असल्याची जोरदार चर्चा काही महिन्यांपूर्वी रंगली होती. मात्र, यात काही तथ्य नसल्याचे म्हणत त्यांनी ही चर्चा फेटाळून लावली होती. काही महिन्यांपूर्वी अमोल कोल्हे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली होती. तसेच केंद्रीय  राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांचीही त्यांनी भेट घेतली होती. या भेटीगाठीमुळे चर्चेला उधाण आले होते. त्यांनतर अमोल कोल्हे यांनी केलेल्या या पोस्टमुळे  पुन्हा एकदा चर्चेवा उधाण आले आहे.