मुंबई : विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस (Amruta Fadanvis) यांनी मुंबईत एका कार्यक्रमात केलेल्या वक्तव्याने नवा वाद उभा राहण्याची शक्यता आहे. माजी गृहमंत्री आणि माजी पोलीस आयुक्त कुठे हनिमूनला गेलेत, असा खोचक सवाल अमृता फडणवीस यांनी केला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अनेक नेते कारवाईला सामोरे जात नाहीएत, तपास यंत्रणांना ते कारणं देत आहेत असा प्रश्न अमृता फडणवीस यांना विचारण्या आला. यावर उत्तर देताना अमृता फडणवीस यांनी त्यांना 'मस्ती आली आहे, माजी गृहमंत्री, माजी पोलीस आयुक्तांचे कुठे हनीमून चालले आहेत आपल्याला माहित नाही, पण हे व्हायला नको', असं म्हटलं आहे. तुम्हालाही कुठे दिसले तर रिपोर्ट करा म्हणजे लवकर पकडता येईल त्यांना असंही अमृता फडणवीस यांनी म्हटलं आहे. 


देशात 100 कोटी लसीकरण पूर्ण होणार आहे. त्यानिमित्त गिरगावच्या माधवबागमध्ये एका कार्यक्रमासाठी अमृता फडणवीस आल्या होत्या. तेव्हा त्यांनी अनिल देशमुख आणि परमबीर सिंग यांच्याबाबत हे वक्तव्य केलं.


ड्रग्सविरोधी कारवाईचं समर्थन


महाराष्ट्र प्रगतीच्या दृष्टीने पुढं जावा कि ड्रग्स कॅपिटल बनावं हे आपल्यालाच ठरवायचं आहे, तरुण पिढीला त्यामुळे तुरुंगात टाकावं हा माझा वैयक्तिक विचार नाहीए, त्यांना सुधारण्याची जास्त गरज आहे तुरुंगापेक्षा. पण त्याआधी हे कळायला पाहिजे कि ते येतं कुठून, कुठे त्याची नेटवर्कस आहेत, असं म्हणज अमृता फडणवीस यांनी एनसीबीच्या कारवाईचं समर्थन केलं आहे.