मुंबई : सध्या एकमेकांवर निशाना साधण्यासाठी, ट्रोल करण्यासाठी सर्वात प्रभावी साधन म्हणजे सोशल मीडिया. सोशल मीडियाच्या माध्यमातून सामान्य जणता, कलाकार, त्याचप्रमाणे राजकीयमंडळी देखील एकमेंकांवर आरोप-प्रत्यारोप करत असतात. विविध मुद्द्यांवरील आपली भूमिका लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी नेते ट्विटर, फेसबुक अशा माध्यमांचा वापर करतात. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

काही दिवसांपासून माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस या देखील ट्विटरवर प्रचंड सक्रिय झाल्या आहेत. विधानसभा निवडणुकीनंतर भाजप आणि शिवसेनेत प्रचंड मतभेद निर्माण झाले. त्यामुळे याचा परिणाम त्यांच्या संबंधांवरही झाला आहे. 



या वादात आता देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी उडी मारली आहे. अमृता फडणवीस सतत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर ट्विटरच्या माध्यमामातून टीका करताना दिसत आहेत. नुकताच ट्विटरवर सक्रिय झालेल्या अमृता फडणवीस यांच्या फॉलो करणाऱ्यांची संख्या फार मोठी आहे. 


सध्या ट्विटरवर चांगल्याचं सक्रिय असलेल्या अमृता फडणवीसांना ट्विटरवर १ लाख २० हजार लोक फॉलो करतात. तर त्या फक्त तीन जणांना फॉलो करतात. यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा समावेश आहे. तसंच अमृता फडणवीस या पंतप्रधान कार्यालायच्या ट्विटर हँडललाही फॉलो करतात.


अमृता फडणवीस आणि शिवसेनेमधला वाद मिटण्याची चिन्हं नाहीत. अमृता फडणवीसांनी ट्विटरवरून शिवसेनेच्या धोरणावर किंवा नेत्यावर टीका केली की त्याला तितकंच तिखट प्रत्युत्तर दिलं जातं आहे. मात्र या वादामध्ये अमृता उपाध्यक्ष असलेल्या अॅक्सिस बँकेला मोठा फटका बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे.