महाआघाडी सरकारवर अमृता फडणवीसांचा शाब्दीक वार
समित ठक्करचा ट्विटमध्ये केला उल्लेख
मुंबई : विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांना कोरोनाची लागण झाली आहे. फडणवीस सरकारी रुग्णालयात दाखल झाले आहेत. असं असताना आता त्यांची पत्नी अमृता फडणवीसांनी दसऱ्याच्या दिवी ट्विट करत महाआघाडीवर शाब्दिक वार केले आहेत.
कोरोना व्हायरस आणि पेग्विन महाआघाडी व्हायरस दोन्ही कधी, कसे आणि कुठे सामान्यांवर हावी होतील हे सांगू शकत नाही. क्वारंटाईनपासून वाचण्यासाठी अंतर ठेवणं गरजेचं आहे. कायमच तोंडावर पट्टी लावून ठेवा.... सुरक्षित राहा... गप्प राहा....असं ट्विट अमृता फडणवीस महाआघाडी सरकारवर टीका केली आहे.
महाराष्ट्र पोलिसांनी समित ठक्कर नामक व्यक्तीला शनिवारी अटक केली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबत बदनामीकारक मजकूर सोशल मीडियावर प्रसारीत केल्याच्या आरोपाखाली समित ठक्कर नामक व्यक्तीला अटक करण्यात आली आहे.पोलिसांच्या या कारवाईबाबत आनंद रंगनाथन यांनी ट्विटरद्वारे नाराजी व्यक्त केली. समित ठक्कर यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांना पावरलेस मुख्यमंत्री म्हटले होते. त्यामुळेच समितला अटक करण्यात आली काय? असा प्रश्न रंगनाथन यांनी विचारला होता.
आनंद रंगनाथन यांनी केलेल्या ट्विटला उत्तर देत अमतृा फडणवीस यांनी म्हटले की, कोरोना व्हायरस आणि पेग्विन महा सरकार दोन्ही व्हायरस आहेत. केव्हा, कोठे कसे सामान्यांवर आक्रमन करतील सांगता येत नाही. क्वारंटाईन होण्यापासून वाचण्यासाठी स्वत:हून दूर राहा. तोंडावर सतत मास्क लावा. सुरक्षीत राहा... गप्प राहा, असे अमृता फडणवीस यांनी म्हटले आहे.