मुंबई : एनसीबीचे Zonal Director समीर वानखेडे यांच्यावर आरोपांची मालिका सुरु करणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक (Nawab Malik) यांनी थेट विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांच्यावर आरोप करत खळबळ उडवून दिली आहे. नवाब मलिक यांनी देवेंद्र फडणवी यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्यासोबत एका व्यक्तीचा फोटो ट्विट केला, मुंबई रिव्हर अँथम या गाण्याला अर्थसहाय्य करणारा व्यक्ती हा जयदीप राणा असून तो ड्रग्ज पेडलर आहे, तो सध्या कारागृहात आहे, तसंच देवेंद्र फडणवीस आणि जयदीप राणा यांचे घनिष्ठ संबंध आहेत असा आरोप नवाब मलिक यांनी केला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नवाब मलिक यांनी केलेल्या आरोपांना आता अमृता फडणवीस यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. नवाब मलिक यांनी आपल्या जावयाला विचारावं कोण कोणाच्या पाठिशी आहे,  असं सांगात अमृता फडणवीस यांनी नवाब मलिक यांना आव्हान दिलं आहे. बेनकाब तो नवाबही होता है, और वो जरुर होगा,  ज्या स्त्रिया सरळ रस्त्याने चालत आहेत, त्यांना डिवचू नका, तेच आज माझ्याबरोबर केलं गेलं आहे,  देवेंद्र फडणवीस यांना टार्गेट करायला, पण तुम्ही मर्द असाल तर थेट देवेंद्र फडणवीस यांना टार्गेट करा, मला मध्ये आणू नका असं आव्हान अमृता फडणवीस यांनी दिलं आहे


एका सामाजिक कार्यकर्ती म्हणून मी माझे विचार प्रकट करत आहे, मला कुणीही थांबवू शकत नाही असंही अमृता फडणवीस यांनी म्हटलं आहे. एनजीओने मला संपर्क केला होता, त्यातील रिव्हर मार्च हा सामाजिक उपक्रम होता, यात जनजागृतीच्या हेतूने काम केलं असल्याचं स्पष्टीकरण अमृता फडणवीस यांनी दिलं आहे. 


मुंबई मनपात शिवसेना २० वर्षांपेक्षा जास्त काळ सत्तेत आहे, नद्यांचे नाले झाले त्यावर काम करत नाही, आम्ही मात्र सामाजिक उपक्रम म्हणून काम करत होतो, आमच्याकडे कारखाने शिक्षणसंस्था नाहीत, त्यामुळे आमच्यावर मुद्दाम वेगळे आरोप केले जात असल्याचंही अमृता फडणवीस यांनी म्हटलं आहे.